arman kohli  Team eSakal
मनोरंजन

अरमान कोहलीच्या अडचणीत वाढ! मुंबई हायकोर्टाने नाकारला जामीन

Arman Kohli वर ड्रग्ज सेवन केल्याचे आरोप आहेत.

सुधीर काकडे

बॉलीवूड अभिनेता अरमान कोहली (Arman Kohli) गेल्या काही दिवसांपासून चांगलाच अडचणीत आल्याचं दिसतं आहे. एनडीपीएस प्रकरणात अरमानला जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अरमान ऑगस्ट 2021 पासून न्यायालयीन कोठडीत आहे. अरमानला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा एनसीबीने (NCB) अरमानवर ड्रग्ज सेवनाचे (Drugs) अनेक मोठे आरोप असल्याचे सांगितले होते. एनसीबीने अरमानला अटक करण्यापूर्वी त्याच्या घरावर छापा टाकला होता. त्यादरम्यान त्याच्या घरातही काही प्रमाणात ड्रग्ज सापडले होते.

एनसीबीने अरमान कोहलीची चौकशी केली तेव्हा त्याला ड्रग्ज सेवनाबद्दल प्रश्न विचारले असता त्याने स्पष्ट उत्तर दिले नाही असंही एनसीबीकडून सांगण्यात आलंय. चौकशीनंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अरमान कोहलीला एनसीबी कार्यालयात नेलं. त्यानंतर अरमानला अटक करण्यात आली.

एनसीबीच्या टीमनं १ डिसेंबरला अरमान कोहलीच्या घरी छापा टाकला होता. त्यानंतर त्याची चौकशीही करण्यात आली. आणि त्याला ताब्यात घेण्यात आले. यानंतर बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. एनसीबीच्या अशा धडक कारवाईमुळे बॉलीवूडमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बॉलीवू़डचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरण समोर आले होते. त्यावेळी अनेक मोठमोठ्या सेलिब्रेटींची नावं उजेडात आली होती. अखेर कित्येक सेलिब्रेटींनी प्रेक्षकांना आवाहन करुन आपली बदनामी न करण्यास सांगितले होते. त्यासंबंधी काही पोस्टही व्हायरल केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Pune Metro: आयटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! हिंजवडी मेट्रो स्थानकांना कंपन्यांची कार्यालये थेट जोडणार; पादचारी पुलांची तयारी

रागात पाहिल्याने छातीवर सपासप वार..., मुंबईत गणेशोत्सवात रक्तरंजित थरार; 7 जणांकडून मंडळाच्या अध्यक्षाची हत्या

World Alzheimer Day 2026: साठी ओलांडलीय? मग अल्झायमरची ‘ही’ लक्षणं तुम्हाला माहित असायलाच हवीत!

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT