Bosco Martis Demands 'Justice For Choreographers' 
मनोरंजन

Bosco Martis : 'आम्हाला न्याय कोण मिळवून देणार'? बॉलीवूडच्या प्रसिद्ध कोरिओग्राफर्सनं मांडली मोठी खंत

शाहरुख आता तूच आम्हाला न्याय मिळवून देऊ शकतोस अशा शब्दांत बॉस्कोनं शाहरुखला साकडं घातले आहे.

युगंधर ताजणे

Bosco Martis Demands 'Justice For Choreographers' : बॉलीवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर बॉस्को मार्टिस हा आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. त्यानं इंस्टावर जी पोस्ट शेयर केली आहे त्याची जोरदार चर्चाही होत आहे. शाहरुखच्या पठाण चित्रपटामध्ये आपल्या कोरिओग्राफीनं त्यानं प्रेक्षकांची पसंती मिळवली होती.

बॉस्कोनं आपल्या आजवरच्या करिअरचा उल्लेख करत येत्या काळात नवोदित कोरिओग्राफर्सला क्रेडिट (श्रेय नामावली) च्या समस्येला सामोरं जावं लागू नये म्हणून केलेली पोस्ट अनेकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

आम्हाला न्याय कसा आणि कोण मिळवून देणार... असा प्रश्न बॉस्कोनं त्याच्या पोस्टमधून विचारला आहे. फ्री प्रेस जर्नलनं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. बॉस्कोचे म्हणणे आहे की, सध्या जे बॉलीवूडचे चित्रपट प्रदर्शित होतात त्यामध्ये कोरिओग्राफर्सला जे क्रेडिट मिळायला हवे ते मिळत नाही. त्यामुळे आमच्या लोकांनी केलेलं काम हे प्रेक्षकांपर्यत पोहचत नाही. आमची प्रसिद्धीही होत नाही. त्यासाठी यापुढील काळात आम्हाला चित्रपटातील श्रेय नामावलीत ठळकपणे क्रेडिट मिळावे. असे त्याचे म्हणणे आहे.

बॉस्कोनं त्याच्या इंस्टावरुन शेयर केलेल्या त्या पोस्टला नेटकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. त्यावरुन त्याला मिळालेल्या प्रतिक्रियांमध्ये नेटकऱ्यांनी देखील येत्या काळात कोरिओग्राफर्सचे क्रेडिट त्यांना द्यायलाच हवे. निर्माते आणि दिग्दर्शकांनी याची नोंद घ्यावी. अशा आशयाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बॉस्को त्याच्या पोस्टमध्ये म्हणतो की, तुम्हाला अॅक्टर्स सेलिब्रेटी वाटतात, दिग्दर्शक, गायक सेलिब्रेटी वाटतात पण कोरिओग्राफर्स वाटत नाही. हे चित्र बदलायला हवे. यावेळी त्यानं प्रभु देवा, वैभवी मर्चंट, गणेश आचार्य, फराह खान, रेमो डिसुजा, टेरेन्स लॉरेन्स यांना देखील त्याची ती पोस्ट टॅग केली आहे.

गेल्या २२ वर्षांपासून मी कोरिओग्राफी क्षेत्रात काम करतो आहे. अजुनही कार्यरत आहे. मात्र मला बऱ्याचशा प्रमोशनल मुव्हीमध्ये जे क्रेडिट मिळायला हवे ते मिळताना दिसत नाही. त्याची मोठी खंत आहे. सध्या आपण सोशल मीडियावर ज्या वेगवेगळ्या गाण्यांचे रिल्स पाहतो त्यातून गायक, अभिनेता यांची प्रसिद्धी होते. मात्र आम्ही त्यात नसतो. असेही बॉस्कोनं म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT