Mark Margolis:  Esakal
मनोरंजन

Mark Margolis: जेष्ठ हॉलिवूड अभिनेत्याचे निधन, वयाच्या 83 व्यावर्षी घेतला अखेरचा श्वास...

वयाच्या ८३ वर्षीय 'ब्रेकिंग बॅड' अभिनेत्याने न्यूयॉर्कमधील माउंट सिनाई हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.

Vaishali Patil

जेष्ठ हॉलिवूड अभिनेता 'ब्रेकिंग बॅड' म्हणजेच मार्क मार्गोलिस यांचे गुरुवारी निधन झाले. वयाच्या 83 वर्षीय 'ब्रेकिंग बॅड' अभिनेत्याने न्यूयॉर्कमधील माउंट सिनाई हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. एका निवेदनानुसार मार्गोलिस यांना गुरुवारी न्यूयॉर्कच्या रुग्णालयात अल्पशा आजारानंतर दाखल करण्यात आले होते.

त्याच्या निधनाबद्दल त्यांचा मुलाने ही बातमी चाहत्यांना सांगितली. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. हॉस्पिटलमध्ये त्यांचा मुलगा आणि पत्नीही दिसले.

मार्क मार्गोलिसचा जन्म

मार्क मार्गोलिस यांचा जन्म फिलाडेल्फिया येथे 1939 साली झाला. आपल्या अभिनयात करियर करण्यासाठी त्याने न्यूयॉर्क गाठलं. त्यांनी थिएटरमध्ये काम केले. त्यानंतर ते 'अंकल सॅम' आणि 'द गोलेम'सह 50 हून अधिक ऑफ-ब्रॉडवे प्रॉडक्शनमध्ये दिसले.

मार्क मार्गोलिस यांच्या ब्रेकिंग बॅडचे सह-कलाकार ब्रायन क्रॅन्स्टन यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्याने इंस्टाग्रामवर लिहिले की, 'आज माझ्या मित्राच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झालं. मार्क मार्गोलिस एक दिलखुलास व्यक्तीमहत्व होतं. तो सेटवर खूप विनोद करायचा. मला त्याची नेहमी आठवण येईल.

'स्कारफेस' 'एस व्हेंचुरा: पेट डिटेक्टिव्ह' आणि 'ब्लॅक स्वान' तसेच एचबीओ सिरिज 'ओझ' सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी सहाय्यक भूमिकांसह हिरो म्हणून त्यांनी यशस्वी कारकीर्द केली. 2012 मध्ये त्याला 'ब्रेकिंग बॅड'साठी एमी अवॉर्डसाठी नामांकन मिळाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; तिमाही निकालांमुळे ‘या’ शेअरवर सर्वांची नजर

Maharashtra U-17 Girls Cricket: ईश्वरी अवसरेचा धडाका! १२४ धावांची वादळी खेळी, महाराष्ट्राचा गुजरातवर दमदार विजय

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत भीषण अपघात; पिकअप-दुचाकी धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू

'दुचाकीवर स्वामी अन्...' देऊळ बंद २ चं पहिलं मोशन पोस्टर रिलीज, स्नेहल तरडेच्या डोळ्यात अश्रू, काय असेल कथा?

इथली जागा मुडदे गाडणारी, बेचैन आत्म्यांमुळे ग्रहण; चांगल्या जागेवर इमारत बांधा, शिंदेंच्या मंत्र्याचा महापालिकेला सल्ला

SCROLL FOR NEXT