मनोरंजन

मित्रांबरोबर खेळण्याचा आनंद - प्रथमेश परब 

प्रथमेश परब

‘टाइमपास’ या चित्रपटाद्वारे रातोरात स्टार झालेल्या प्रथमेश परबने हिंदी चित्रपटातही काम केले. निशिकांत कामत यांच्या ‘दृश्यम’ या चित्रपटातील त्याचे खूप कौतुक झाले. मराठी व हिंदी चित्रपट आणि नाटकातही त्याने काम केले. एका सर्वसामान्य कुटुंबातून तो या इंडस्ट्रीत आला आणि मोठा झाला आहे. त्याला ‘सेलिब्रेटी वीकएण्ड’ ही संकल्पना खूप आवडली.

तो म्हणाला, ‘सध्या लॉकडाऊन आहे आणि मी घरी चित्रपट व वेबसीरीज पाहात आहे. परंतु तरीही वीकएण्डबद्दल सांगायचे, तर दर शनिवारी संध्याकाळी आम्ही मित्रमंडळी एकत्र जमतो आणि विलेपार्ले किंवा अंधेरी येथील टर्फ क्लबमध्ये नाईट क्रिकेट खेळतो. मला क्रिकेट व फुटबॉलची खूप आवड आहे. त्यामुळे चित्रीकरण नसले, की आम्ही मित्रमंडळी हमखास हे खेळ खेळतो. मात्र शनिवारी चित्रीकरण असल्यास क्रिकेट खेळता येत नाही, तेव्हा आम्ही भरलेले पैसे वाया जातात. असो. त्याचे एवढे टेन्शन आम्ही घेत नाही. शनिवारी रात्री उशिरा आलो, की सहाजिकच रविवारी सकाळी उठायला उशीर होतो. रविवारी सकाळी कुणाच्या भेटीगाठी घेत नाही. मात्र संध्याकाळी मित्रमंडळी भेटल्यावर फिरायला जाणे किंवा चित्रपट पाहणे होतेच. कारण माझ्या बहुतेक मित्रांना शनिवार आणि रविवार सुट्टी असते. घरच्या मंडळींबरोबर कधी मॉल वगैरे ठिकाणी गेलो नाही, पण मित्रांबरोबर खरेदी आणि फिरणे होते. विलेपार्ले येथे अन्नपूर्णी नावाचे एक हॉटेल आहे, तेथे सॅण्डविच चांगले मिळते. आम्ही मित्रमंडळी तेथे जातो आणि खातो. माझी नाटकातील मित्रमंडळी भेटल्यावर नाटक आणि सिनेमा या गोष्टींवर चर्चा होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आमच्या मित्रमंडळींमध्ये थट्टामस्करी खूप चालते. राज ठाकरे यांच्या भाषणावर आमची चर्चा होते. मग साहजिकच राजकारणाचा विषय चर्चिला जातो. कधी कधी माझे फॅन्स रविवारी संध्याकाळी मला भेटायला चक्क घरीही येतात. माझा एक फॅन नाशिकहून आला होता भेटायला. त्याने ‘टाइमपास’ चित्रपट पाहिलेला होता आणि त्या चित्रपटाचे चित्रीकरण जेथे जेथे झाले तेथे तेथे जाऊन त्याने फोटो काढलेले होते. कामावरून सुट्टी घेऊन ठाणे वगैरे ठिकाणी जाऊन त्याने ते फोटो काढलेले होते. ते फोटो पाहून मीदेखील अवाक् झालो. कारण त्याने चित्रपटाची लोकेशन्स कशी आणि कुठून मिळविली, असा मला प्रश्‍न पडला...नाशिकहून कामावरून सुट्टी घेऊन तो येथे आला आणि त्याने फोटो काढले. तो माझा फॅन मला येऊन भेटला...खरोखरच त्या फॅन्सचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे...’ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT