Shreya Bugde
Shreya Bugde Google
मनोरंजन

Podcast :'कमरेखालचे विनोद म्हणजे...' श्रेया बुगडेनं मारला सिक्सर

प्रणाली मोरे

गेल्या अनेक वर्षांपासून 'चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yevu Dya) या 'झी मराठी(Zee Marathi) वरील कार्यक्रमातनं एकमेव महिला अभिनेत्री म्हणून जी मिरवत आहे अन् घराघरातील रसिकांच्या मनावर राज्य करून आहे अशा श्रेया बुगडेनं(Shreya Bugde) सकाळ पॉडकास्टशी अनेक विषयांवर आपली मत बिनधास्त मांडली आहेत. मग कुणी विनोदाची राणी म्हणा की कुणी विनोदाशिवाय दुसरं काही येत नाही म्हणून करत नाही असं म्हणा यावरनं श्रेयानं तिचं एक बिनधास्त मतप्रदर्शन सकाळ पॉडकास्ट मुलाखतीतून केलं आहे. विनोदामुळे ओळख मिळाली पण तरिही अभिनयाचे सगळे जॉनर आपल्याला करायचे आहेत हे सांगताना श्रेयानं एक विशेष गोष्ट या मुलाखतीत नमूद केली आहे. या बातमीत तिच्या मुलाखतीची लिंक जोडत आहोत,नक्की ऐका.

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम गेली अनेक वर्ष सुरू आहे त्यावरनं श्रेयाला विचारलं की,एकच गोष्ट करून कंटाळा आला नाही का किंवा एखादा नवीन कार्यक्रम येत असताना या कार्यक्रमाला बंद करण्याविषयी कधी चर्चा झाली आहे का तेव्हा पटकन श्रेया म्हणाली, ''बंद होईल पण फक्त तेव्हाच....'' आता ते 'तेव्हा' म्हणजे ती कशाविषयी बोलत आहे हे उत्तर पुढे जोडलेल्या पॉडकास्ट मुलाखतीच्या लिंकमध्ये आहे. 'चला हवा येऊ द्या' मध्ये एकटी स्त्री असल्याचे फायदे-तोटे याविषयी आणि महिला कलाकारांचं किचन पॉलिटिक्स ? यावरही ती व्यक्त झाली आहे. आता मुळ मुद्दा तर पुढेच आहे ज्याचं उत्तर देऊन तिनं सिक्सर मारला आहे.

'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडे हिची सकाळ पॉडकास्ट मुलाखतीची लिंक इथे वर जोडली आहे. आपण तिच्या खुसखुशीत उत्तरांची मुलाखत इथे ऐकू शकता.

या मुलाखतीत श्रेया बिनधास्त व्यक्त झाली आहे ती 'कमरेखालचे विनोद म्हणजे....'या मुद्द्यावर. तिच्या या उत्तरानं 'विनोद' या अभिनयाच्या जॉनरला जवळून समजता येईलं इतकं नक्की. फॅन्सच्या अनुभवांपासून सेटवरच्या इतर सहकलाकारांसोबतच्या गमतीही श्रेयानं या मुलाखतीत शेअर केल्या आहेत. त्यासाठी या बातमीत जोडलेली श्रेया बुगडेची ही पॉडकास्ट मुलाखत नक्की ऐका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT