Sonam Kapoor And Anand Ahuja Host A Welcome Party  esakal
मनोरंजन

David Beckham Welcome : जगप्रसिद्ध फुटबॉलपटू 'डेव्हिड बेकहॅम' साठी सोनम कपूरकडून खास पार्टीचं आयोजन!

जगातील प्रभावशाली फुटबॉलपटूंमध्ये डेव्हिड बेकहॅमचे नाव हे नेहमीच घेतले जाते.

युगंधर ताजणे

Sonam Kapoor And Anand Ahuja Host A Welcome Party : जगातील प्रभावशाली फुटबॉलपटूंमध्ये डेव्हिड बेकहॅमचे नाव हे नेहमीच घेतले जाते. बेकहॅमच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. जगभर त्याचे चाहते आहेत. सोशल मीडियावर देखील बेकहॅम हा अॅक्टिव्ह असल्याचे दिसून आले आहे. पहिल्यांदाच भारतात आलेल्या बेकहॅमसाठी बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूरनं खास पार्टीचे आयोजन केले होते.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्युझीलंडचा सेमीफायनलचा सामना पार पडला. हा सामना पाहण्यासाठी डेव्हिड बेकहॅमनं हजेरी लावली होती. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं बेकहॅमचे स्वागत करुन त्याच्याशी संवाद साधला होता. आपण भारतात पहिल्यांदाच आलो असून यापूर्वी कित्येकदा येण्याचा विचार केला होता, मात्र ते काही शक्य झाले नाही. भारतात झालेल्या स्वागतानं आपण भारावून गेलो. अशी प्रतिक्रिया याप्रसंगी बेकहॅमनं दिली होती.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

यानंतर बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि प्रख्यात अभिनेते अनिल कपूर यांची लेक सोनम कपूरनं डेव्हिडसाठी खास पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी हजर होते. ते फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर आलेल्या कमेंट्स भन्नाट आहेत. सोनम कपूर आणि तिचे पती आनंद अहुजा यांनी या वेलकम पार्टीचे आयोजन केले होते.

डेव्हिड हा तीन दिवसांच्या भारत भेटीवर आला असून यावेळी तो वेगवेगळ्या मान्यवरांना भेटणार असल्याची माहिती आहे. वानखेडे स्टेडियमवर बॉलीवूडमधील कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, व्यंकटेश डग्गुबाती या सेलिब्रेटींनी डेव्हिडची भेट घेत त्याच्यासोबत फोटोही काढले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्याकडून ज्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते त्यात शाहिद कपूर, त्याची पत्नी मीरा रजपूत, अनिल कपूर, फरहान अख्तर, शिबानी दांडेकर हे सेलिब्रेटी सहभागी झाल्याचे दिसून आले. या सगळ्यात कियारा आणि सिद्धार्थ अडवाणीचा डेव्हिडसोबतचा तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Nepal Border Dispute : लिपुलेख-कालापानी वादात चीनची एन्ट्री? भारताने नेपाळला सुनावले; द्विपक्षीय यंत्रणा असताना तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही!

Velhe News : खानापूर-पानशेत मार्गावरील पूल वाहतुकीसाठी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

KDMC Demolition : कल्याणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावरून हायव्होल्टेज ड्रामा! पूर्वसूचना न देता बुद्धविहार, स्तूपांची तोडफोड केल्याचा आरोप; बुद्धभूमी फाउंडेशन आक्रमक

CBSE OSM Controversy : CBSE चा मोठा निर्णय! थेट अध्यक्षांची उचलबांगडी, मोदी सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; नेमकं कारण काय?

Electric Shock : अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT