deepika  
मनोरंजन

दीपिका पदूकोण आज चार्टर विमानाने गोव्याहून मुंबईला होणार रवाना, एनसीबीच्या चौकशीसाठी उद्या राहणार हजर

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- बॉलीवूड ड्रग केसमध्ये एनसीबीच्या रडारवर असलेल्या अभिनेत्री दीपिका पदूकोणची २५ सप्टेंबरला चौकशी केली जाणार आहे. ड्रग प्रकरणात समोर आलेल्या सेलिब्रिटींच्या नावामध्ये दीपिका पदूकोण सगळ्यात मोठी व्यक्ती आहे. ती बॉलीवूडच्या ए लिस्टर अभिनेत्रींपैकी दीपिका एक आहे. सध्या दीपिका शूटींगसाठी गोव्यात आहे. एनसीबीचे समन मिळाल्यानंतर दीपिका आज दुपारी गोव्यावरुन मुंबईला रवाना होईल.

गोवा एअरपोर्ट CISF नुसार दीपिका आज दुपारी १२.३० वाजता गोव्यावरुन मुंबईसाठी रवाना होईल. एअरपोर्टवर व्हीआयपी सुरक्षेसाठी CISF ला अलर्ट केलं गेलं आहे. दीपिका चार्टर विमानाने मुंबईला येईल. हे विमान हैदराबाद वरुन येणार आहे. गोव्यातून दीपिका पदूकोणला या विमानाने मुंबईत येईल. 

ड्रग्स प्रकरणात दीपिका पदूकोणचं नाव आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दीपिकाचं ड्रग चॅट समोर आलं होतं. त्यात ती क्वान कंपनीची मॅनेजर करिश्मासोबत ड्रगविषयी बातचीत करत असल्याचं समोर आलं होतं. आता दीपिकाला एनसीबीच्या कठीण प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे.

दीपिकाला समन मिळाल्यानंतर ती टेंशनमध्ये आल्याचं म्हटलं जातंय.  दीपिकाने तिच्या कुटुंबियांशी आणि लीगल टीमसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बातचीत केली आणि वकिलांकडून सल्ला घेतला. या प्रकरणात आत्तापर्यंत दीपिकाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दीपिकासोबतंच एनसीबीने करिश्मा प्रकाशला देखील समन पाठवले होते. करिश्माची देखील या ड्रग कनेक्शनबाबत चौकशी होणार आहे.   

deepika padukone will leave from goa in afternoon for mumbai ncb summon drug case  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT