deputy CM devendra fadnavis Recommend actor prashant damle name for padma award to central government  sakal
मनोरंजन

Prashant Damale: प्रशांत दामलेंना पद्म पुरस्कार? देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान; म्हणाले..

प्रशांत दामलेंना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे शिफारस केली आहे.

नीलेश अडसूळ

prashant damle : अभिनेते प्रशांत दामले यांच्या 12 हजार 500 व्या विक्रमी नाट्य प्रयोगाचे रविवारी 6 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. या प्रयोगाला अनेक राजकीय मान्यवरांनीही हजेरी लावली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या प्रयोगाला हजर होते. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली.

यावेळी दामले यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी प्रशांत दामले यांना पद्म पुरस्कार देण्याचा प्रस्ताव केंद्राला दिला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणावीस स्पष्ट केले. 12 हजार 500 प्रयोग प्रशांत दामले यांनी केले, ही राज्याच्यादृष्टीने अभिमानाची बाब आहे. त्यामुळे प्रशांत दामले यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावेळी यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, 'त्यांना पद्म पुरस्कार देण्यात यावा यासाठीच आधीच केंद्र सरकारला पाठवला आहे.'

या शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी नाट्यसृष्टीच्या प्रश्नांवर लक्ष वेधले. लवकरच राज्यातील सर्व नाट्यगृह सुस्थितीत असतील अशी ग्वाही त्यांनी दिली. मराठी कलाकारांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे आहे,'असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT