Ed Sheeran Shah Rukh Khan Video  esakal
मनोरंजन

Ed Sheeran Shah Rukh Video : 'जॉन सीना' नंतर 'एड शिरन' लाही पडली शाहरुखची भुरळ! 'त्या' व्हिडिओतून किंग खानला सलाम

Ed Sheeran आणि किंग खानच्या त्या व्हायरल व्हिडिओनं नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांना उधाण आलं आहे.

युगंधर ताजणे

Ed Sheeran Singer Meets Shah Rukh Khan : जगप्रसिद्ध गायक एड शिरन याची महती काही वेगळीच आहे. जगाच्या पाठीवर त्याचा मोठा चाहतावर्ग आहेच याशिवाय भारतातही त्याची लोकप्रियता काही कमी नाही. तो सध्या मुंबईमध्ये त्याच्या आगामी कॉन्सर्टची तयारी करतो आहे. या दरम्यान त्याच्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आपल्या मुंबई दौऱ्याच्या दरम्यान शिरन हा बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटींच्या भेटीगाठी घेत आहे. यातच त्याचा बॉलीवूडचा किंग खान शाहरुख सोबतचा व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. त्यानं शाहरुखच्या आयकॉनिक पोस्टची कॉपी करत शाहरुखची दाद मिळवली आहे. सोशल मीडियावर तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतो आहे.

यापूर्वी शिरननं प्रसिद्ध अभिनेता आयुषमान खुराणा आणि अरमान मलिक यांची भेट घेतली होती. आता त्याचा किंग खानसोबतचा व्हायरल झालेला फोटो चर्चेचा विषय आहे. किंग खानसोबतची भेट यादगार व्हावी या उद्देशानं त्यानं असं काही केलं चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. किंग खानच्या चाहत्यांनी देखील शिरीनचे आभार मानले आहे.

शिरननं त्याच्या ऑफिशियली इंस्टाग्रामवरुन तो व्हिडिओ पोस्ट केला आहे. यावेळी शाहरुखच्या शेजारी शिरीननं उभा राहून ओम शांती ओम चित्रपटातील दिवानगी दिवानगी या गाण्यावर ती आयकॉनिक पोझ दिली आहे. त्या व्हिडिओला शिरीननं कॅप्शनही दिली आहे. त्यात तो म्हणतो की, ही आमची पोझ आहे. आम्ही दोघे मिळून चाहत्यांच्या प्रेमाचा स्विकार करतो आहोत.

एड शिरनच्या कॉन्सर्टविषयी बोलायचं झाल्यास येत्या १६ मार्च रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स मध्ये त्याचा परफॉर्मन्स होणार आहे. तो त्याच्या म्युझिक टूर मॅथमॅटिक्सचा शेवटचा टप्पा असणार आहे. यावेळी त्याच्यासोबत प्रतिक कुहाड देखील परफॉर्म करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT