nia sharma 
मनोरंजन

हा ड्रेस आहे की कचऱ्याची पिशवी? निया शर्मा सोशल मीडियावर ट्रोल

सकाळ ऑनलाइन

हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा ही तिच्या वेगवेगळ्या लूकमळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या प्रत्येक फोटोला चाहत्यांची पसंती मिळते. ती नेहमी वेगवेगळे लूक ट्राय करत असते. तिचा फॅशन सेन्स हटके आहे हे तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून कळते. अशाच एका हटके ड्रेसमधील फोटो नियाने पोस्ट केले आहेत. मात्र यावेळी ती चाहत्यांकडून चांगलीच ट्रोल झाली आहे. 

नियाने या फोटोमध्ये काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. हा ड्रेस कचऱ्याच्या पिशवीसारखा दिसत आहे अशी कमेंट नेटकऱ्यांनी केली आहे. तर हा ड्रेस काहींना छत्रीसारखा वाटला तर काहींना गाडीच्या कव्हरसारखा वाटला. एकानेतर चक्क 'गाडी वाला आया घरसे कचरा निकाल' हे गाणं  कमेंटमध्ये लिहिलं.

नियाच्या या फोटोला दोन दिवसात दोन लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. पण या फोटोच्या कमेंट्स वाचून प्रत्येकालाच हसू येत आहे. या फोटोमध्ये  नियाने काळ्या रंगाची टोपी आणि काळ्या रंगाचा गॉगल घातला आहे. हा लूक करण्याचं धाडस केल्याबद्दल अनेकांनी तिचं उपहासात्मक कौतुक केलं आहे. निया लवकरच 'जमाई राजा 2.0' या मालिकेत निया दिसणार आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शासकीय इमारतीला भीषण आग; पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत वापर झालेल्या ४ हजार ईव्हीएम जळून खाक, काय घडलं?

मधुभाऊ सायलीला सत्य सांगणार; तीच खरी तन्वी असल्याचं उघड होणार; 'ठरलं तर मग' मध्ये मोठा ट्विस्ट, प्रोमो पाहून नेटकरी खुश

अभिनय, क्रिकेट टिमच्या ओनरशिपनंतर प्रीती झिंटा आता दागिन्यांच्या व्यवसायात! लॉन्च केला नवीन लक्झरी ज्वेलरी ब्रँड

Numerology : 'या' 2 मुलांकाचे लोक असतात प्रचंड हसमुख, पण एका चुकीच्या घटनेमुळे बदलून जाते त्यांचे आयुष्य

Latest Marathi News Live Update : नागपूर शहरातील काही भागात पावसाच्या सरी

SCROLL FOR NEXT