Prajakta Mali
Prajakta Mali Instagram
मनोरंजन

पावनखिंड फेम प्राजक्ता माळीच्या मनात विवाह संस्थांविषयी का आहे राग?

प्रणाली मोरे

झी मराठी वाहिनीवरील 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेपासून सुरू झालेला प्राजक्ता माळी(Prajakta Mali)चा अभिनय क्षेत्रातला प्रवास खूपच इंट्रेस्टिंग आहे. तिनं मालिकेत काम केलं, सिनेमात मोठ्या पडद्यावर अभिनेत्री म्हणून रमली,विनोदी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं, ट्रॅव्हल शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना भटकंती घडवून आणली ते अगदी 'प्राजक्त प्रभा' पुस्तकाच्या माध्यमातून तिच्या कवितांनी रसिक मनाला आनंद देण्याचंही काम केलं. चला तर मग,सकाळ पॉडकास्ट मुलाखतीच्या माध्यमातून प्राजक्ता माळीशी साधलेला दिलखुलास संवाद नक्की ऐका.

पावनखिंड सिनेमाची अभिनेत्री प्राजक्ता माळीची पॉडकास्ट मुलाखत नक्की ऐका. आणि जाणून घ्या तिच्या वैयक्तिक आयुष्यातल्या तिनं शेअर केलेल्या काही खास गोष्टी.

प्राजक्तानं या पॉडकास्ट मुलाखतीत केवळ तिच्या सिनेमांविषयी,लेखनाविषयीच गप्पा मारल्या नाहीत तर तिनं तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टीं विषयी देखील खुलासे केले आहेत. सध्या ती एका विवाह नोंदणी करणाऱ्या वेबसाईटची जाहिरात करत आहे. तेव्हा तिचे लग्नासाठी असं नोंदणी करण्यावर काय मत आहे यावर प्रश्न विचारला असता तिनं स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या त्या प्रसंगाविषयी थेट सांगून टाकले. अन् म्हणाली,''मी विवाहासाठी नोंदणी करुन तोंडावर पडलेय,आता लग्न करणार तर.... तिच्या लग्नाच्या त्या रोखठेक मतांविषयी जाणून घ्यायचं असेल तर नक्की इथं पॉडकास्ट मुलाखतीची लिंक जोडली आहे ती ऐका.

प्राजक्ता खरंतर खूप उत्तम लिहिते पण अभिनेत्री म्हणून खूप कमी कालावधी अभिनेत्रीला मिळतो त्यामुळे सध्या अभिनयालाच प्राधान्य,त्यानंतर लिखाण आणि नृत्यकला असं तिनं आवर्जुन सांगितलं. महाराष्ट्रातील किल्ल्यांविषयी बोलताना तिनं सरकारला कळकळीची विनंती करत काही सूचनाही केल्या आहेत. ज्या खरंच महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचल्या तर त्याचा नक्कीच फायदा आपल्या महाराष्ट्राला होईल. प्राजक्ता लवकरच अंकुश चौधरीसोबत 'लकडाऊन' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाबाबत ती नेमकी का उत्सुक आहे याचं कारणही तिनं स्पष्ट केलं आहे. मुलाखतीत प्राजक्तानं वैयक्तिक आयुष्यातला सांगितलेला संघर्ष आपल्याला खूप काही शिकवून जाईल. पण त्यासाठी बातमीत जोडलेली तिची मुलाखत नक्की ऐका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT