Gadar 2 Box Office Collection Day 9: Esakal
मनोरंजन

Gadar 2 Box Office Collection Day 9: 'गदर2' ऐकेना काही केल्या थांबेना! दुसऱ्या शनिवारी कमाईचा आलेख उंचावला..

Vaishali Patil

Gadar 2 Box Office Collection Day 9: गेल्या काही दिवसात बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे रिलिज झाले मात्र त्यात फक्त काहीच चित्रपट हे हिट ठरले. त्यातच एंट्री केली ती सनी देओलच्या 'गदर 2'ने. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर गदर केला.

सनी देओलच्या 'गदर 2'ने पहिल्या आठवड्यातच बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा गल्ला जमवला. आता हा चित्रपट रिलिज झाल्यानंतर दुसरा विकेंड सुरु झाला आहे तरी देखील सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे.

अनिल शर्माच्या 'गदर 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या शनिवारी देखील जोरदार सुरुवात केली. चित्रपटाने शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी सुमारे रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

sacnilk च्या रिपोर्टनुसार, सनी आणि अमिषाच्या चित्रपटाने रिलिजच्या 9व्या दिवशी जवळपास 35 कोटींचा गल्ला जमवला आहे. यासोबतच चित्रपटाचे कलेक्शन 336.13 कोटींवर पोहोचले आहे.

तर 'गदर 2' ने जगभरात 395.10 कोटींची कमाई केली आहे. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अद्याप 350 कोटींचा टप्पा पार केला नसला तरी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट 400 कोटींच्या दिशेने कमाई वाटचाल करत आहे.

'गदर 2' च्या दुसऱ्या शनिवारच्या कलेक्शनने सर्व ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकत पुन्हा रेकॉर्ड केला आहे. 'बाहुबली 2' ने रिलिजच्या दुसऱ्या शनिवारी 26.50 कोटी तर 'KGF 2' ने केवळ 18.25 कोटी आणि 'RRR'ने 18 कोटी रुपये कोटींची कमाई केली तर 'पठाण'ने 23.25 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यात आता सनी पाजीच्या 'गदर 2' ने सर्वाधिक कलेक्शन करत रेकॉर्ड केला आहे.

रिलीजच्या 8 दिवसांत 'गदर 2' ने कमाईच्या बाबतीत 300 कोटींचा रेकॉर्डब्रेक व्यवसाय केला आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल सध्या चित्रपटाच्या अफाट यशाचा आनंद घेत आहे. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात दोघही या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करताना दिसताय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT