Gadar 2 Vs OMG 2  esakal
मनोरंजन

Gadar 2 Vs OMG 2 Advance Booking : गदर 2 की OMG 2? सनी आणि अक्षयच्या शर्यतीचा प्रदर्शनापूर्वीच लागला निकाल!

दोन्ही बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यानं बॉक्स ऑफिसवर काय होणार याची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे.

युगंधर ताजणे

Gadar 2 Vs OMG 2 Sunny Deol Akshay Kumar box office : सनी देओलच्या गदर २ ची आणि अक्षय कुमारच्या ओएमजी २ ची आता जोरदार चर्चा रंगताना दिसते आहे. हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी म्हणजे अकरा ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यापूर्वी देखील काही वर्षांपूर्वी सनी अन् अक्षयच्या चित्रपटांचे क्लॅश झाले होते. त्यावेळी अक्षयनं बाजी मारली होती.

यावेळी गोष्ट मात्र गंभीर आहे. सनी देओलच्या गदरनं देशभरामध्ये मोठी वातावरण निर्मिती केली आहे तर अक्षयच्या चित्रपटानं देखील लक्ष वेधून घेतले आहे. सनीच्या गदर २ चा काही दिवसांपूर्वी ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला होता. त्याला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद देखील मोठा होता. अक्षयच्या ओएमजी २ च्या ट्रेलरनं देखील प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

दोन्ही बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यानं बॉक्स ऑफिसवर काय होणार याची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. दोन्ही चित्रपट बिग बजेट आहेत. त्यात असणाऱ्या स्टार कलाकारांचा भरणा आणि स्टोरी लाईन ही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी आहे. सनीच्या गदरचा तब्बल दोन दशकांनी दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षयचा ओएमजी २ हा अकरा वर्षांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.

टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार गदर २ आणि ओएमजी २ च्या अॅडव्हान्स बुकींगला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. त्यात मात्र गदर आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. गदर २ नं आतापर्यत तब्बल ४५ हजार अॅडव्हान्स तिकीट बुकींगपर्यत मजल मारली आहे. तर ओएमजी २ ची साडेसात हजार तिकीटं बूक झाली आहेत. यावरुन कुणाचे पारडे जड असणार याविषयी चर्चेला उधाण आले आहे.

अनिल शर्मा दिग्दर्शित गदरचा पहिला भाग हा २००१ मध्ये आला होता. त्यात सनी देओल, अमिषा पटेल यांच्या मुख्य भूमिका होत्या. तर २०११ मध्ये आलेल्या ओमजीच्या पहिल्या भागात अक्षय कुमार, परेश रावल, महेश मांजरेकर, मिथून चक्रवर्ती यांच्या मुख्य भूमिका होत्या. दुसऱ्या भागात अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांच्या भूमिका आहेत. हे दोन्ही चित्रपट अकरा ऑगस्ट रोजी एकमेकांसमोर येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT