Ganesh Chaturthi 2023 Allu Arjun Daughter Arha making  esakal
मनोरंजन

Ganesh Chaturthi 2023 : 'अल्लु तुझी लेक तुझ्यासारखीच कलाकार'! आरहानं तयार केलेला बाप्पा नेटकऱ्यांच्या कौतुकाचा विषय

सोशल मीडियावर मनोरंजन विश्वातील सेलिब्रेटींकडे लाडक्या गणरायाचे आगमन होत असते.

युगंधर ताजणे

Ganesh Chaturthi 2023 Allu Arjun Daughter Arha making : सध्या सगळीकडे गणराच्या आगमनाची उत्सुकता आहे. त्यानिमित्तानं वेगळं वातावरण सभोवताली असताना बाप्पाच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. केवळ महाराष्ट्रच नाहीतर देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये बाप्पाचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले जाते.

सोशल मीडियावर मनोरंजन विश्वातील सेलिब्रेटींकडे लाडक्या गणरायाचे आगमन होत असते. त्याचे फोटो आणि व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. त्यातच टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अल्लु अर्जूनच्या लेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांचा खूपच प्रतिसाद मिळतो आहे. अल्लु अर्जून हा गेल्या दोन वर्षांपासून चर्चेतील सेलिब्रेटी झाला आहे. त्याला कारण त्याचा पुष्पा नावाचा चित्रपट.

Also Read - Libya Flood : मृतदेहांचा रस्त्यावर खच,मदतीची केविलवाणी प्रतीक्षा, युद्धाच्या आगीतून बाहेर पडणारा लिबिया आता पूराच्या

अल्लुच्या पुष्पा द रुल नावाचा चित्रपट पुढील वर्षी ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. बॉक्स ऑफिसवर अल्लुच्या पुष्पा नावाच्या चित्रपटानं विक्रम केला होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांना त्याच्या दुसऱ्या भागाचे वेध लागले होते. त्याविषयी माहिती देणारी पोस्ट काही दिवसांपूर्वी मेकर्सनं शेयर केली होती. आता अल्लुच्या लेकीनं आरहानं एक व्हिडिओमधून आपणही काही कमी नसल्याचे म्हटले आहे.

आरहा ही सहा वर्षांची असून तिनं स्वत: बाप्पाची इको फ्रेंडली मूर्ती तयार केली आहे. आरहानं यापूर्वी अभिनयातही कमाल केलेली आहे. तिचा आणि रश्मिकाच्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. आता तिनं तयार केलेली मूर्ती नेटकऱ्यांच्या कौतुकाचा विषय आहे. काहींनी अल्लुबरोबरच आरहाची प्रशंसा केली आहे.

अल्लुची पत्नी स्नेहा रेड्डीनं इंस्टाग्रामवरुन स्टोरी शेयर केली आहे. ज्यात आरहानं गणरायाची सुंदर इको फ्रेंडली मूर्ती तयार केली आहे. तो व्हिडिओ आता ट्विटवर देखील व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहेत. कित्येकांनी अल्लु अर्जूनपेक्षा चिमुरड्या आरहाचे कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT