Ganesh Chaturthi 2023 Esakal
मनोरंजन

Ganesh Chaturthi 2023: अंबानींच्या घरी गणरायाचा जल्लोष! बॉलिवूडकरांची मांदियाळी.. व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गणेश चतुर्थीचा जल्लोष पहायला मिळत आहे. सर्व सामान्यापासून तर कलाकारांपर्यंत सर्वांनीच आपापल्या घरी बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले आहेत.

मुकेश अंबानी यांनी देखील गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांचे आलिशान घर अँटिलिया सजवले होत. वाजत गाजत त्यांनी गणपतीचे स्वागत केले. यानंतर बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींसह राजकारणातील अनेक दिग्गज मंडळी सहभागी झाले होते.

मुकेश अंबानी यांच्या 'अँटीलिया' या घरी गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. या सेलिब्रेशनमध्ये संपूर्ण बॉलिवूडकरींनी हजेरी लावली होती. यात आलिया भट्ट, अनन्या पांडे, जान्हवी कपूर, खुशी कपूर, कियारा अडवाणी यांच्यासह अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींनी उपस्थीती लावली. यावेळी मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं. नीता यांनी पिवळ्या आणि सोनेरी रंगाची पारंपारिक साडी नेसली होती.

याच पार्टीत सलमान खान आणि दिग्दर्शक अॅटली देखील दिसला. याचबरोबर रेखा ऐश्वर्या बच्चन आपल्या मुलीसोबत दिसली. याच पार्टीत शाहरुख खान त्याची पत्नी गौरी, मुलगा अबराम आणि मुलगी सुहाना देखील आली होती.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एथनिक लूकमध्ये हे जोडपे खुपच सुंदर दिसत होते. तर क्रिकेट जगतातील कलाकार देखील यावेळी दिसले. यात कृणाल आणि हार्दिक पांड्याही आपल्या कुटुंबासह क्रिकेटच्या मैदानात पोहोचले. सुनील शेट्टी, आथिया आणि राहूलने देखील हजेरी लावली. सूर्य कुमार यादव देखील पत्नीसोबत या उत्सवात सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT