gauri kulkarni engagement from aai kuthe kay karte  SAKAL
मनोरंजन

Gauri Kulkarni Engagament: आई कुठे काय करते फेम गौरी कुलकर्णीने केला साखरपुडा?

आई कुठे काय करते मालिकेतील गौरीची भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने खऱ्या आयुष्यात लग्न केलंय

Devendra Jadhav

Gauri Kulkarni Engagement News: आई कुठे काय करते मालिकेत गौरीची भुमिका साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णीने खऱ्या आयुष्यात साखरपुडा केल्याची खास गोष्ट घडलीय.

आई कुठे काय करते मालिकेतील गौरी म्हणजेच अभिनेत्री गौरी कुलकर्णीने साखरपुडा केल्याची चर्चा आहे. गौरीने एक फोटो पोस्ट करुन तिच्या हातातली अंगठी दाखवलीय. याखाली "its Happening" असा हॅशटॅग वापरलाय. गौरीचा हा फोटो पाहताच अनेकांनी तिला कमेंटमध्ये साखरपुडा झाल्याबद्दल अभिनंदन केलंय

गौरीने साखरपुड्याची अंगठी दाखवत दिली गुड न्यूज

गौरीने तिच्या सोशल मिडीयावर एक घोषणा केली. यात तिने #itsHappening असा हॅशटॅग वापरलाय. गौरीने लिहीलंय की, तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादासाठी धन्यवाद, योग्य वेळ आली की मी अधिक तपशील उघड करेन,

अशी पोस्ट तिने करत ही बातमी शेअर केलीय. गौरीने खरंच साखरपुडा केलाय का? याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. परंतु अनेकांनी गौरीला कमेंटमध्ये साखरपुड्यासाठी खास शुभेच्छा दिल्यात.

गौरीने साखरपुडा केला की नाही?

गौरीने साखरपुडा केला की नाही याचा खुलासा तिने अजुन केला नाहीय. गौरीने फक्त हातातली अंगठी सर्वांना दाखवलीय. पण याचा अर्थ तिने साखरपुडा केलाय अशी चर्चा सुरु झालीय.

अनेक फॅन्स आणि मिडीयाने गौरीने साखरपुडा केलाय अशा बातम्या केल्यात. गौरीने सुद्धा या सर्व शुभेच्छा पुन्हा रिपोस्ट केल्यात. त्यामुळे गौरी स्वतःहून सांगत नसली तरीही तिने साखरपुडा केलाय अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT