Ghar Banduk Biryani  
मनोरंजन

Ghar Banduk Biryani : 'हलगी वाजली काळजाला भिडली', 'बिरयानी' रंगली! नागराजचा नवा अवतार

यंदाच्या वर्षापासून मराठी चित्रपटांचा बाज, त्यांचे विषय आणि त्यांच्या सादरीकरणाची पद्धत हे सारं वेगळ्याच प्रकारे समोर येताना दिसते आहे.

युगंधर ताजणे

Ghar Banduk Biryani : मराठीमध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण करुन प्रेक्षकांना आपला चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहित करणारा दिग्दर्शक आणि अल्पावधीतच ज्याच्या वाट्याला मराठी आणि हिंदी प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद वाट्याला आला त्या नागराजच्या घर बंदूक बिरयानी नावाच्या चित्रपटाची मोठी चर्चा आहे. त्याच्या प्रदर्शित झालेल्या ट्रेलरनं तर प्रेक्षकांना थक्क केलं आहे.

नागराज मंजुळेचा कोणताही नवा चित्रपट येतो असं म्हटल्यावर त्याच्या चाहत्यांमध्ये त्याविषयी कमालीची उत्सुकता असते. दिग्दर्शनात आपली ओळख निर्माण केल्यानंतर नागराज हा अभिनयामध्ये देखील आपलं नाणं खणखणीत आहे हे या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगू पाहतोय. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या घर बंदुक बिरयानीची मराठी चित्रपट विश्वामध्ये चर्चा आहे. त्याविषयी केवळ प्रेक्षकच नाहीतर मराठीतल्या दिग्गजांना देखील मोठी उत्सुकता आहे.

Also Read - हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

यंदाच्या वर्षापासून मराठी चित्रपटांचा बाज, त्यांचे विषय आणि त्यांच्या सादरीकरणाची पद्धत हे सारं वेगळ्याच प्रकारे समोर येताना दिसते आहे. यापूर्वी आलेल्या रौंदळ चित्रपटाचा वेगळा विषय, त्याची कथा, त्याची मांडणी आणि सादरीकरण याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. अशातच प्रख्यात दिग्दर्शक नागराजचा घर बंदुक बिरयानीचा ट्रेलर व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे.

नागराजची पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील इंट्री ही तर बॉलीवूड आणि टॉलीवूड चित्रपटांतील भल्याभल्या अभिनेत्यांना अवाक करणारी आहे. वेगळ्या विषयावरील या चित्रपटामध्ये नागराज बरोबरच प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे देखील आहे. सध्या या चित्रपटाची टीम राज्यभर प्रमोशनमध्ये व्यस्त असताना व्हायरल झालेल्या ट्रेलरचं प्रेक्षकांनी दिलखुलासपणे कौतूक केली आहे. त्याला उस्फुर्त दाद दिली आहे.

नागराजचा चित्रपट आणि त्यात हलगी वाजणार नाही असं होणार नाही. यापूर्वीच्या त्याच्या चित्रपटांमध्ये त्यानं संगीताचा केलेला प्रभावी वापर दिसून आला आहे. फँड्रीमधील हलगी असो, झुंडमधील असो आणि आता घर बंदुक बिरयानीमधील असो त्यानं चित्रपटाबद्दल तयार होणारी वातावरण निर्मिती जबरदस्त आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहताना हे जाणवतेच.

सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सुरज अवघडे यांची भूमिका असलेला हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचे दिग्दर्शन हेमंत अवताडे यांनी केले असून त्याची निर्मिती नागराज मंजुळेनं केली आहे. तर संगीत दिग्दर्शन ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT