grand welcome of guest outside udaipur airport for parineeti chopra raghav chadha wedding  SAKAL
मनोरंजन

Parineeti - Raghav Wedding: परिणीती - राघवच्या स्वागताची जय्यत तयारी, उदयपूर एअरपोर्ट बाहेर पंजाबी नृत्याने पाहुण्यांचं स्वागत

परिणीती - राघवच्या लग्नाची जय्यत तयारी दिसून येतेय

Devendra Jadhav

Parineeti - Raghav Wedding: परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरु आहे. या दोघांच्या लग्नाला अवघे काहीच तास उरले आहेत. परिणीती - राघवच्या लग्नाची सर्वांना उत्सुकता आहे.

परिणीती - राघवच्या लग्नासाठी त्यांचे कुटुंबिय - मित्रमैत्रिणी उदयपूरला रवाना झाले आहेत. पाहूण्यांच्या स्वागतासाठी उदयपूर एअरपोर्टबाहेर जय्यत तयारी झालेली दिसतेय.

(grand welcome of guest outside udaipur airport for parineeti chopra raghav chadha wedding)

उदयपूर एअरपोर्टबाहेर पाहूण्यांचं ग्रँड स्वागत

ANI ने नुकताच एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत उदयपूर एअरपोर्टबाहेर मोठमोठे होर्डींग्ज लावलेले पाहायला मिळत आहे. परिणीती - राघवच्या लग्नासाठी पाहूणे आणि या दोघांचे मित्र-मैत्रिणी विविध ठिकाणांहून उदयपूरला रवाना झालेत.

अशातच या दोघांचे लग्नासाठी आलेल्या पाहूण्यांचं जय्यत स्वागत करण्यात येत आहे. एअरपोर्टवर वाद्य वाजवत भांगडा डान्स करत अदाकार पाहूण्यांचं वेलकम करत आहेत.

परिणीतीच्या घराला शानदार रोषणाई

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ताज्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये, परिणीती चोप्राचा मुंबईतील बंगला राघव चड्ढासोबतच्या तिच्या भव्य लग्नापूर्वी उजळून निघताना दिसत आहे.

उदयपूरच्या ताज लेक पॅलेस आणि लीला पॅलेस या दोन आलिशान हॉटेल्समध्ये या दोघांचा विवाहसोहळा होत असला तरी, नववधूच्या कुटुंबीयांनी घर सजवल्याने लग्नाआधी घराला शानदार लायटींग केलीय.

व्हिडिओंवरून असे दिसते की चोप्रा आणि चड्ढा कुटुंबांनी परिणीती - राघव यांच्या लग्नाच्या उत्सवासाठी सुंदर अशी सोनेरी-थीम असलेली सजावट निवडली आहे.

परिणीती - राघवच्या लग्नाची तारीख

काहीच दिवसांपूर्वी परिणीती - राघवच्या लग्नाच्या पत्रिका सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झाली. त्यात लग्न केव्हा, कुठे आणि किती वाजता आहे हे सांगून टाकलं आहे. परिणीती आणि राघव हे येत्या ३० सप्टेंबर रोजी लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.

ते चंदीगडमधील ग्रँड ताज हॉटेलमध्ये लग्न करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आम्ही चढ्ढा कुटूंबीय आपल्या सर्वांना त्या ग्रँड वेडिंगसाठी निमंत्रित करतो आहोत. आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Dahihandi: ९व्या थरावरून गोविंदा कोसळला, मनसेच्या गणेश चुक्कल दहीहंडीत थरारक प्रकार

नॅशनल हायवेवर थांबलेल्या ट्रकला कार धडकून८ इंजिनिअर विद्यार्थ्यांचा मृत्यू; घटनेचा CCTV VIDEO VIRAL

Solapur Ganesh Mandal Electricity : मंडळांना अर्जानंतर २४ तासांत वीज महावितरणकडून ऑनलाइन अर्जाची सुविधा; मिरवणूक मार्गावरही कर्मचारी तैनात

Marathi News Live Updates: अलंकार महिला पीजी कॉलेजमध्ये NEET PG 2026ची पुनर्परीक्षा सुरू, परीक्षा केंद्रांवर कडेकोट सुरक्षा

Nandurbar MBBS Student : नंदुरबारात 'एमबीबीएस'च्या २१ वर्षीय विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT