ranbir alia 
मनोरंजन

क्वारंटाइनमध्ये असलेल्या रणबीरची आलियाला येतेय आठवण; पोस्ट केला खास फोटो

स्वाती वेमूल

अभिनेता रणबीर कपूरला कोरोनाची लागण झाली असून तो घरीच क्वारंटाइनमध्ये राहत आहे. रणबीरला कोरोना झाल्याची माहिती त्याची आई नीतू कपूर यांनी सोशल मीडियाद्वारे दिली होती. त्यानंतर आलियानेही स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलं होतं. क्वारंटाइनमध्ये असलेल्या रणबीरची आठवण येत असल्याने आता तिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. 'major missing' असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. या फोटोमध्ये आलिया आणि रणबीरने हातात हात घेतल्याचं दिसत आहे. आलियाने पोस्ट केलेल्या या फोटोला अवघ्या १५ मिनिटांत ५० हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर अनेकांनी कमेंट्ससुद्धा केल्या आहेत. रणबीर-आलियाने याआधीही मुलाखतींमध्ये एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त केलं होतं. 

आलियाने काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. भन्साळी यांनासुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे कळताच आलियाने स्वत:ची कोरोना चाचणी करून घेतली. यात आलियाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून तिने काही दिवस क्वारंटाइनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता तिने पुन्हा एकदा शूटिंगला सुरुवात केली आहे. तर रणबीर अजूनही क्वारंटाइनमध्ये आहे. रणबीरपासून दूर असल्याने त्याच्या आठवणीत आलियाने हा फोटो पोस्ट केला आहे. 

अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नात रणबीर आणि आलियाने एकत्र हजेरी लावली होती. तेव्हापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आलिया आणि रणबीरने मुलाखतींमध्ये आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये प्रेमाची कबुली दिली. हे दोघं लवकरच 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र झळकणार आहेत. या वर्षात रणबीर-आलिया लग्न करणार असल्याचीही चर्चा आहे. लॉकडाउन नसता तर आतापर्यंत आम्ही लग्न केलं असतं, असं खुद्द रणबीर एका मुलाखतीत म्हणाला होता.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT