Hardik Joshi 
मनोरंजन

Hardik Joshi: राणादा 'या' मालिकेत करणार धमाकेदार एन्ट्री; 'जाऊ बाई गावात'नंतर दिसणार नव्या भूमिकेत!

अभिनेता हार्दिक जोशीची (Hardeek Joshi) एन्ट्री ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Tuzech Mi Geet Gaat Aahe: छोट्या पडद्यावरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. एकीकडे वैदेहीच्या मृत्यूला मोनिकाच जबाबदार असल्याचं सत्य सर्वांसमोर उघड होणार आहे. तर दुसरीकडे मोनिकासाठी सनी नावाच्या व्यक्तीने लिहिलेली प्रेमपत्र मल्हारच्या हाती लागणार आहेत. त्यामुळे मल्हार आणि मोनिकाच्या नात्यात तणाव निर्माण झाला आहे. अशातच आता अभिनेता हार्दिक जोशीची (Hardeek Joshi) एन्ट्री ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत होणार आहे.

शुभंकरच्या एन्ट्रीनं मालिकेत येणार ट्वीस्ट

मल्हार-मोनिकाचं नातं निर्णायक वळणावर असताना मालिकेत पुन्हा एकदा अभिनेता हार्दिक जोशीची म्हणजेच शुभंकरची एन्ट्री होणार आहे. मोनिकाला प्रेमपत्र लिहिणारा सनी म्हणजे स्वत: शुभंकर असल्याचा खुलासा तो करणार आहे. त्यामुळे शुभंकरच्या रुपात मोनिकाच्या आयुष्यात पुन्हा नवं वादळ आलं आहे. अडचणीच्या या परिस्थितीतून मोनिका कसा मार्ग काढणार? मल्हार मोनिकाला माफ करणार का? काय असेल मल्हार-मोनिकाच्या नात्याचं भविष्य हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.

हार्दिक हा गेल्या काही महिन्यांपासून 'जाऊ बाई गावात' या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाचे हार्दिक सूत्रसंचालन करत होता. अशताच आता तो ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत पुन्हा एन्ट्री करत असल्यानं त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

हार्दिकनं 'या' मालिकांमध्ये केलं काम

हार्दिक जोशीला तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेत तो राणादा ही भूमिका साकारत होता. हार्दिकनं तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, अघोरी,दुर्व, राजा शिवछत्रपती या मालिकांमध्ये देखील हार्दिकनं काम केलं आहे. आता हार्दिकला ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत बघायला प्रेक्षक उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT