Hema Malini dancing the role of Meera at mathura, Prime Minister Modi heartily applauded SAKAL
मनोरंजन

Hema Malini: हेमा मालिनींनी मीरा नृत्य करुन सर्वांना केले मंत्रमुग्ध, पंतप्रधान मोदींचीही दाद, व्हिडीओ व्हायरल

हेमा मालिनींचा हा डान्स व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय

Devendra Jadhav

Hema Malini Dance Video: ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आजवर त्यांच्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. हेमा मालिनींच्या अभिनयाचे जसे असंख्य चाहते आहेत तसंच त्यांच्या नृत्याचेही चाहते आहेत.

वयाची पंच्याहत्तरी ओलांडून गेली तरीही हेमा आजही त्यांच्या नृत्याने सर्वांना मंत्रमुग्ध करतात. हेमा यांच्या नृत्याविष्काराचा असाच अनुभव नुकताच समोर आला.

हेमा सध्या भाजपकडून मथुरेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार देखील आहे. नुकतेच मीराबाईंच्या सन्मानार्थ हेमा यांनी मथुरेत नृत्यनाट्य सादर केले.

गुरुवारी, 23 नोव्हेंबर रोजी, मथुरेतील लोकांनी मीराबाईंची 525 वी जयंती साजरी केली. या विशेष प्रसंगी हेमा मालिनी यांनी मीराबाईचे कृष्णाप्रती असलेले प्रेम दर्शविणारे नृत्यनाट्य सादर केले. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही उपस्थिती होती.

गोल्ड बॉर्डर असलेल्या पिवळा लेहेंगा, नथ आणि एक भव्य नेकलेससह सोन्याचे दागिने हेमा मालिनी यांनी परिधान केले होते.

हेमा यांचा हा डान्स व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. हेमा यांच्या नृत्य सादरीकरणाला पंतप्रधान मोदींसह उपस्थित लोकांनी दाद दिली.

ब्रज राज उत्सवादरम्यान मीराबाई जन्मोत्सव साजरा करताना हेमा मालिनी यांनी संत मीराबाई यांच्या जीवनावर आधारित दीड तास चालणारे नृत्यनाट्य सादर केले.

मीराबाई जन्मोत्सव तीन दिवस, 23 ते 25 नोव्हेंबर दरम्यान, संत मीरा बाई यांच्या 525 व्या जयंतीनिमित्त मथुरेत आयोजित केला जातो. मीरा यांना भगवान कृष्णाच्या दैवी भक्तीसाठी ओळखले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोणाला मंत्रिपद मिळणार? भाजप खासदारांच्या दिल्लीतील हालचालींनी वाढवला सस्पेंस, अनेक नेते दिल्लीत तळ ठोकून

Pune Noise Pollution: निर्बंध कागदावरच! पुण्यात दहीहंडीत डीजेचा दणदणाट, आवाज ९० डेसिबलपर्यंत

Drip and Sprinkler Irrigation: कमी पाण्यात भरघोस पीक अन् ९०% पर्यंत सरकारी अनुदान; शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचनाचे मोठे फायदे!

आजचे राशिभविष्य - ०६ सप्टेंबर २०२६

Pune News : पुणे शहरात बंदी असूनही लेझर लाईटचा धुमाकूळ

SCROLL FOR NEXT