hemangi kavi share special song mahaparinirvan din dr babasaheb ambedkar SAKAL
मनोरंजन

Mahaparinirvan Din: "माझ्या भीमानं लावली, शिक्षणाची हळद मला…", 'महापरिनिर्वाण दिना'निमित्त हेमांगीचं गाणं, व्हिडीओ बघा

महापरिनिर्वाण दिनानिमित्त हेमांगीच्या आगामी सिनेमातलं नवीन गाणं शेअर केलं

Devendra Jadhav

Mahaparinirvan Din: ६ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली देण्यासाठी लाखो अनुयायी एकवटणार आहेत.

अशातच महापरिनिर्वाण दिनानिमित्त हेमांगीने तिच्या आगामी सिनेमातलं एक खास गाणं शेअर केलंय. या गाण्याचे शब्द, संगीत ऐकुन सर्वांना हे गाणं आवडेल यात शंका नाही.

माझ्या भीमानं लावली शिक्षणाची हळद मला, गाणं भेटीला

हेमांगी कवीने तिच्या आगामी 'तिचं शहर होणं' सिनेमातलं एक गाणं शेअर केलंय. या गाण्यात पवार आणि कांबळे कुटुंबातील हळदीचा प्रसंग दिसतो. यावेळी बॅकग्राऊंडला हे गाणं वाजतं. माझ्या भीमानं लावली, शिक्षणाची हळद मला… असे या गाण्याचे बोल आहेत.

शाहू, फुले अन् भीमानं दिली ज्ञानाची ताकद, अशा सुंदर ओळींनी हे गाणं सजलंय.

हेमांगी गाणं शेअर करुन लिहीते

हेमांगी हे गाणं शेअर करुन लिहीते, "रस्सा, काय गाणं लिहीलंयस गं!
#जयभीम. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आमच्या ‘तिचं शहर होणं ‘ चित्रपटातील हे गाणे तुमच्या भेटीस आणत आहोत. माझ्या भीमानं लावली, शिक्षणाची हळद मला…

रसिका आगाशेने हे गाणं लिहिलं असुन राहूल रानडेने संगीतबद्ध केलंय. नंदेश उमप यांनी हे गाणं गायलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT