Armaan Malik  Esakal
मनोरंजन

Armaan Malik: दोन बायका अन् एकाचं वेळी प्रेग्नंट, नेटकऱ्यांनी अरमानची घेतली शाळा!

सकाळ डिजिटल टीम

यूट्यूबर अरमान मलिक हा आधीच आपल्या दोन लग्नामूळं प्रसिद्ध आहे. अरमान मलिक आपल्या दोन बायकांसोबत एकत्र राहतो आणि त्याच्या दैनंदिन जीवनाचं व्हिडिओ आणि ब्लॉग टाकत असतो. आता या पठ्ठाने असं काही केलं आहे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अरमानच्या दोन्ही बायका आता एकाचवेळी प्रेग्नंट आहेत. हे ऐकून लोक अरमानला ट्रोल करत आहेत.

(Hyderabad-based YouTuber Armaan Malik has two wives Payal Malik and Kritika Malik both are pregnant)

अरमान अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहतो. आता अरमानने असा खुलासा केला आहे, ज्यानंतर त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. अरमानने 2011 मध्ये पायलसोबत लग्न केले होते. यानंतर, 2018 मध्ये, त्याने पत्नीची सर्वात चांगली मैत्रीण कृतिकासोबत लग्न केले. अरमान मलिकच्या दोन बायका पायल मलिक आणि कृतिका मलिक या दोघी बरोबर एकत्र राहतो. अरमानलची पहिली पत्नी पायल हिला एक मुलगा आहे.

आता अरमानच्या दोन्ही बायका एकत्र प्रेग्नंट झाल्या आहेत. अरमानने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर दोन्ही पत्नींच्या गरोदरपणाची घोषणा केली. त्याने इंस्टाग्रामवर दोन्ही पत्नींसोबतचे फोटो शेअर केले आहेत. अरमानच्या दोन्ही बायका त्यांचे बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना अरमानने कॅप्शनमध्ये लिहिले - माझं कुटुंब.

अरमानची पोस्ट समोर आल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही जण अरमानचं अभिनंदन करत आहेत, तर दोन्ही बायका गरोदर असताना अनेक जण त्याला ट्रोल करत आहेत. अरमानच्या दोन्ही बायका एकत्र प्रेग्नंट कशा असू शकतात याचा अनेकांना धक्का बसला आहे. लोक अरमानची चेष्टा करत आहेत आणि त्याला खोटा असल्याचं बोलत आहेत. एका युजरने " दोघी एकाच वेळी गर्भवती झाल्या आहेत का"? दुसर्‍या यूजरने लिहिले - "मला आश्चर्य वाटते... दोघी एकत्र प्रेग्नंट कसे असू शकतात" " भारताची लोकसंख्या आधीच जास्त आहे यात हे नवीन" " याच काय खर नाही हा तिसरपण लग्न करेल आणि तिघीना प्रेग्नंट करेल" या पेक्षाही वाईट कमेंट्सने करत लोकांनी त्याला ट्रोल केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Session: भास्कर जाधव आणि कल्याणशेट्टींमध्ये वाद, विधानसभेतच एकमेकांचा बाप काढला; धक्कादायक Video समोर

रामराव वडकुते कोण? राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या नेत्याला राज्यसभेची उमेदवारी

Latest Marathi News Live Update : ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा वितुष्ठता, राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने उद्धव ठाकरेंचा अबोला

'सावळ्याची जणू सावली' मध्ये होणार नव्या अभिनेत्रीची एंट्री; सावलीसमोर येणं आणखी एक संकट

Maharashtra Export: युद्धामुळे महाराष्ट्राला फटका! जेएनपीए बंदरात सुमारे 2 हजार कंटेनर अडकले, निर्यातीवर परिणाम

SCROLL FOR NEXT