IFFA 2022 Award Abu Dhabhi  esakal
मनोरंजन

IFFA 2022 : श्रीवल्लीच्या प्रसादची हवा! A.R Rehman ला स्टॅण्डिंग ओव्हेशन

अबु धाबीच्या जवळ असलेल्या एका आयलंडवर बॉलीवूडचा सगळ्यात मोठा पुरस्कार सोहळा पार पडला.

युगंधर ताजणे

Entertainment News: अबु धाबीच्या जवळ असलेल्या एका आयलंडवर बॉलीवूडचा सगळ्यात मोठा पुरस्कार सोहळा पार पडला. गेल्या काही (Social media news) वर्षांपासून आयफाच्या पुरस्कार सोहळ्याची महती वाढत चालल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी पार पडलेल्या या (Bollywood News) कार्यक्रमाला बॉलीवूडमधील वेगवेगळे सेलिब्रेटी उपस्थित होते. मात्र यंदाच्या आयफा 2022 च्या पुरस्कार सोहळ्यामध्ये (Entertainment Gossip) बाजी मारली ती साऊथच्या संगीतकारानं. त्याचे नाव देवी श्री प्रसाद उर्फ डीएसपी. ज्यानं पुष्पामधील श्रीवल्ली, उ अंटावा सारऱ्या गाण्यांना संगीतबद्ध केलं. त्या प्रसादची आयफाच्या सोहळ्यामध्ये हवा होती. बॉलीवूडच्या भाषेत सांगायचे झाल्यास 'बोले तो एकदम हिट'. प्रसादचं बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी कौतुक केलं.

याशिवाय भारताला ऑस्कर मिळवून देणारे संगीतकार ए आर रहमान यांना देखील यावेळी स्टँडिंग ओवेशन मिळाले. अतरंगी चित्रपटातील संगीत दिग्दर्शनासाठी त्यांना पुरस्कारानं गौरविण्यात आले. या सोहळ्यामध्ये सर्वात लक्षवेधी बाब होती ती म्हणजे प्रसिद्ध गायक हनी सिंगनं ए आर रहमान यांच्या पायावर डोके ठेवणे. सध्या तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. आयफाच्या या सोहळ्यामध्ये जय भानुशाली, ध्वनी भानुशाली, असीस कौर, जहरा खान, नेहा कक्कर, अनन्या पांडे, जॅकलीन फर्नांडिझ यांनी आयफाच्या सोहळ्यामध्ये प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.

देवी श्री प्रसाद उर्फ डीएसपी हा सध्याच्या घडीला आघाड़ीचा संगीतकार आहे. त्याचा स्वतंत्र असा चाहतावर्ग आहे. त्यानं जेव्हा आयफामध्ये परफॉर्मन्स सादर केला तेव्हा त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. डीएसपीच्या श्रीवल्ली गाण्यानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. याशिवाय डीएसपीनं वेगवेगळी गाणी सादर करुन उपस्थित प्रेक्षकांना दाद देण्यास भाग पाडले. यावेळी गुरु रंधावा आणि हनी सिंग यांची जुगलबंदीही पाहायला मिळाली. नेहा कक्करनं देखील आपल्या बहारदार गायकीनं प्रेक्षकांची मनं जिंकुन घेतली.

पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि चित्रपटांची नावं पुढील प्रमाणे -

- सरदार उधम

सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, संकलन, स्पेशल इफेक्टस,

- अंतरंगी रे

बॅकग्राइंड स्कोर, कोरियोग्राफी -विजय गांगुली (चकाचक)

- शेरशाह

स्क्रीन प्ले - संदीप श्रीवास्तव

- थप्पड

संवाद - अनुभव सिन्हा, मृण्मयी लागू

- तानाजी द अनसंग वॉरिअर

साउंड डिझाईन - लोचन कानविंदे

- फिल्म 83

साउंड मिक्सिंग - अजय कुमार, मानिक बत्रा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update: क्रिकेट चाहत्यांच्या सोयीसाठी मुंबई आणि अहमदाबाद तसेच पुणे ते अहमदाबाद दरम्यान विशेष गाड्या

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

T20 WC, IND vs NZ: 'अरे तेच तेच काय बोलता, काहीतरी वेगळं...' न्यूझीलंड कर्णधाराच्या वॉर्निंगवर सूर्यकुमारचं थेट उत्तर

स्ट्रेस फ्री झोन, शांत आणि योग क्षेत्र, अर्बन फॉरेस्ट अन् बरंच काही! मुंबईत अनोखे उद्यान उभारणार; पण कुठे? वाचा संपूर्ण योजना...

SCROLL FOR NEXT