Ileana Dcruz blessed with baby boy:  Esakal
मनोरंजन

Ileana Dcruz blessed with baby boy: इलियाना झाली आई! लाडक्या लेकाचा फोटो शेयर करत सांगितलं युनिक नाव...

इलियानाने 1 ऑगस्ट 2023 रोजी मुलाला जन्म दिला. तब्बल पाच दिवसांनी तिने ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली.

Vaishali Patil

Ileana Dcruz blessed with baby boy: बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि चर्चेत असणाऱ्या इलियानानं चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. इलियाना आता एका गोंडस बाळाची आई झाली आहे. तिने जेव्हापासून तिच्या गरोदरपणाची घोषणा केली तेव्हापासून ती चर्चेत आली होती.

तिचं लग्न झालेलं नाही त्यामुळे या बाळाचे वडिल कोण? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी तिला विचारले. तिच्यावर टिकाही झाली होती.

तिने तिच्या चाहत्यांसोबत आताप्रयत्न अनेक फोटो आणि व्हिडिओ शेयर केले. आपल्या लेकाचा फोटो शेयर करत आता तिने आई बनल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

इलियानाने 1 ऑगस्ट 2023 रोजी मुलाला जन्म दिला. तब्बल पाच दिवसांनी तिने ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली. इतकच नाही तर लाडक्या मुलाचा पहिला फोटोही तिने चाहत्यांसोबत शेअर केला.

ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये इलियानाचा छोटा राजकुमार झोपलेला आहे. फोटो शेयर करत तिने लेकाचं नावही सांगितलं आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे, 'कोआ फिनिक्स डोलनला भेटा. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट रोजी झाला. तिने तिच्या लेकाचं नाव 'कोआ फिनिक्स डोलन' ठेवलं आहे.

त्याचबरोबर पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, 'आमच्या लाडक्या मुलाचे जगात स्वागत करताना आम्हाला किती आनंद होत आहे याचं वर्णन शब्दात करता येणार नाही. आमचं हृदय प्रेमाच्या भावनेने भरले आहे.'

काहीवेळातच इलियाना डिक्रूझची ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली. तिच्या चाहत्यांबरोबरच अनेक कलाकारांनी तिचे खुप अभिनंदन केले आहे.

तिचा प्रियकर सेबॅस्टियन लॉरेंट मिशेलपासून तिला हे बाळ झाल्याचं बोललं जातं आहे. काही काळापूर्वी तिने तिच्या जोडीदाराबद्दल खुलासा करत त्याचा एक फोटोही शेयर केला होता.

ती लग्नापुर्वीचं आई झाल्याने चर्चेत होती. काही काळापूर्वी अभिनेत्रीच्या एंगेजमेंटच्या बातम्याही समोर आल्या होत्या, मात्र यावरही तिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

'बर्फी', 'बादशाहो', 'मैं तेरा हीरो', 'रुस्तम' आणि 'पागलपंती' यांसारख्या सिनेमांसाठी प्रसिद्ध असलेली इलियाना लवकरच काम केले आहे. अनफेअर अँड लव्हली नावाच्या कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे ज्याचं शूटिंग पूर्ण झालं असून हा सिनेमा 2023 मध्येच प्रदर्शित होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Live Updates Marathi : राहुल गांधींच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात युवक काँग्रेसचं आंदोलन

Manchar Power Cuts: मंचर शहरात दररोज पाच-सहा वेळा वीज खंडित; २० हजार ग्राहक हैराण, रुग्णालये व व्यवसायांवर मोठा परिणाम

Cyber Crime : सायबर चोरट्यांना बँक खाते वापरण्यास देऊन एक कोटी ३२ लाखांची फसवणूक

Kanersar Health Camp: कनेरसरमध्ये मोफत आरोग्य शिबिर, वह्या वाटप व गुणवंतांचा सत्कार; मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त विधायक उपक्रम

Cooperative Reforms: बदलत्या आर्थिक काळात पतसंस्था व बँकांनी सक्षम, पारदर्शक व व्यावसायिक होण्याचे प्रा. शिवाजीराव काळुंगे यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT