Ileana D'Cruz may be quitting her film career Esakal
मनोरंजन

Ileana D'Cruz Quit Film Industry: इलियाना डिक्रूझ घेणार अभिनय क्षेत्रातून संन्यास? का होतेय चर्चा?

Vaishali Patil

Ileana D'Cruz may be quitting her film career: बॉलीवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. इलियाना एका गोंडस मुलाची आई झाली आहे.

तिने तिच्या मुलाचे नाव कोआ फेनिक्स डोलन ठेवलं आहे. ती सध्या मुलासोबत वेळ घालवत आहे. सध्या ती चित्रपटात सक्रिय नसली तरी ती सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत कनेक्ट राहते.

इलियाना तिच्या मुलाचे अनेक फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असत

तिने मे महिन्यात मायकेल डोलनशी लग्न केल्याच्या चर्चा आहे. ती लग्नाआधीच गरोदर होती. मात्र आता रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात येत आहे की, इलियाना आता यूएसएला जाण्याचा विचार करत आहे. त्यामुळेच ती कोणत्याही चित्रपटाची ऑफर स्वीकारत नाहीये.

इलियानाला तिच्या फॅमिलीवर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यामुळे आता ती पुन्हा बॉलिवूडमध्ये काम करणार नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र याबाबत इलियानाने स्वत: काही प्रतिक्रिया दिलेली नाही.

इलियाना डिक्रूझच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली, वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी इलियानाने दक्षिण चित्रपटांमध्ये पदार्पण केले.

यानंतर तिने रणबीर कपूर आणि प्रियांका चोप्रासोबत 'बर्फी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'रुस्तम', 'रेड', 'मैं तेरा हिरो', 'पागलपंती' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये इलियानाने काम केले आहे.

इलियानाने 1 ऑगस्ट 2023 रोजी मुलाला जन्म दिला आहे. आता ती त्याच्यासोबत वेळ घालवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE OSM Controversy : CBSE चा मोठा निर्णय! थेट अध्यक्षांची उचलबांगडी, मोदी सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; नेमकं कारण काय?

Velhe News : खानापूर-पानशेत मार्गावरील पूल वाहतुकीसाठी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

KDMC Demolition : कल्याणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावरून हायव्होल्टेज ड्रामा! पूर्वसूचना न देता बुद्धविहार, स्तूपांची तोडफोड केल्याचा आरोप; बुद्धभूमी फाउंडेशन आक्रमक

Electric Shock : अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT