Marathi Actor Dr. Mohan Agashe esakal
मनोरंजन

Actor Mohan Agashe : 'चित्रपट' फक्त मनोरंजनासाठी नाही, तर आपल्या भावविश्वाला समृद्धही करतात - अभिनेते मोहन आगाशे

चित्रपट हा केवळ मनोरंजनासाठी नाही तर आपल्या भावविश्वाला समृद्ध करण्यात त्याचा मोठा वाटा असतो.

सकाळ डिजिटल टीम

रसिकांशी संवाद साधत डॉ. आगाशे यांनी संवेदनशील व माहितीपूर्ण विवेचन केले.

रत्नागिरी : चित्रपट हा केवळ मनोरंजनासाठी नाही तर आपल्या भावविश्वाला समृद्ध करण्यात त्याचा मोठा वाटा असतो. हे सर्व विचार करून किंवा ठरवून न होता आपल्या नकळत होते, असे मत अभिनेते (Marathi Actor) आणि मनोचिकित्सक डॉ. मोहन आगाशे (Mohan Agashe) यांनी व्यक्त केले.

रत्नागिरीतील विविध सात संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. मोहन आगाशे यांच्याबरोबरचा चित्रपटाचा (Movie) अनुभव कसा घ्यावा याबद्दलचे चर्चासत्र ''चित्रानुभूती'' या कार्यक्रमानिमित्त रसिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.

३ डिसेंबरला ज. शं. केळकर हॉलमध्ये सुमारे १२५ रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. पाच लघुपट दाखवून त्यावर रसिकांशी संवाद साधत डॉ. आगाशे यांनी संवेदनशील व माहितीपूर्ण विवेचन केले. सूत्रसंचालन डॉ. शाश्वत शेरे यांनी केले.

Marathi Actor Dr. Mohan Agashe

सहयोगी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून आर्ट सर्कलच्या डॉ. मेधा गोंधळेकर, रत्नागिरी फिल्म सोसायटीचे डॉ. नितीन चव्हाण, गोगटे कॉलेज फिल्म क्लबच्या डॉ. निधी पटवर्धन, लॉ कॉलेज फिल्म क्लबचे आशिष बर्वे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉ. तोरल शिंदे व रंगशाळेचे प्रदीप शिवगण यांनी डॉ. आगाशे यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाद्वारे प्राप्त झालेले मानधन सुमित्रा भावे यांच्या निधनानंतर अपूर्ण राहिलेल्या ''आऊट हाऊस'' या फिल्मच्या निर्मिती प्रक्रियेसाठी वापरण्यात येणार असल्याने त्यासाठी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंडमध्ये मंत्र्याचं निधन, छातीतली कळ नॉर्मल समजून सहन करत राहिले, २ तासांनी तीव्रता वाढली अन्...

Marathi News Live Updates : विद्यानंद बापटांना मारहाण करणाऱ्याचा चांदीचं कडं देऊन सत्कार करणार : संग्राम भंडारे

Nashik Accident: गोदाघाटावर थरार! गांधी तलावात पाच मुले बुडू लागली; चार जीवरक्षकांनी वाचविले चौघांचे प्राण, एकाचा मृत्यू

Manoj Jarange: ‘मुंबईला जाण्यापासून रोखण्याचे स्वप्न पाहू नका’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, सलाइन-पाणीही बंद

Nepal Floods: माणुसकीचे दर्शन! कुटुंबाबरोबरच पूरग्रस्तांच्या शोधासाठी प्रयत्न; आप्त हरवले...तरीही इतरांसाठी धडपड

SCROLL FOR NEXT