Indian Academy award 
मनोरंजन

इंडियन अॅकॅडमी अॅवाॅर्ड सोहळा अमेरिकेमध्ये

सकाळवृत्तसेवा

पणजी - भारतीय सिनेमा आता जगातील कानाकोपऱ्यात जाऊन पोहचला आहे. इतर देशात भारतीय सिनेमा कोटीच्या कोटी उड्डाणं करत आहे. या भारतीय सिनेमाचं जागतिक पातळीवर कौतुक होण्यासाठी इंडियन अॅकॅडमी अॅवाॅर्डस सोहळ्याची घोषणा करण्यात आली आहे.

येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतील सॅनफ्रान्सिसको शहरात हा भव्यदिव्य पुरस्कार सोहळा रंगणार आहे. गोव्यात सध्या सुरू असलेल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये या भव्यदिव्य पुरस्कार सोहळ्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. या आगळ्या वेगळ्या पुरस्कार सोहळ्याचं वैशिष्ठय म्हणजे या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड बरोबरच मराठी सिनेमातील कलाकार, तंत्रज्ञांनााही गौरवण्यात येणार आहे. बॉलिवूड, मराठी सिनेमा तसेच टॉलिवू़डच्या सिनेमांनाही गौरवण्यात येणार आहे. तसेच हॉलिवूडच्या सिनेमात जे भारतीय कलाकार आपल्या अदाकारीने प्रेक्षकांना खिळवून ठेवतात अश्या दिग्गजांचाही या पुरस्कार सोहळ्यात विशेष गौरव होणार आहे. 

या पुरस्कार सोहळ्याचं प्रमुख अाकर्षण म्हणजे किंग खान शाहरूख खान इंडियन अॅकॅडमी अॅवॉर्ड सोहळ्याचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य आयोजक आहेत सौरभ पांडे आणि वंदना कृष्णा. त्यांच्यासोबत प्लॅनेट मराठीचे सर्वेसर्वा अक्षय बर्दापूरकर आणि विन्सन वर्ल्डचे संजय शेट्ये हे सुध्दा सहप्रायाेजक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Red Alert : राज्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट; २४ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार सरींचा अंदाज

आजचे राशिभविष्य - 22 जुलै 2026

Tomato Paratha: कधी खाल्लाय का टोमॅटो पराठा? 20 मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी आज नक्की ट्राय करा

NEET Protest: NEET पेपरफुटीवर राहुल गांधींचे मोदींच्या निवासस्थानासमोर आंदोलन; राहुल-प्रियांका गांधी ताब्यात

Khadakwasla Dam Water Storage : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार! पानशेत धरण 69 टक्के भरले; खडकवासला साखळीत 'इतके' टीएमसी पाणी जमा, पाहा पाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT