Ishaan Khatter Trolled: Esakal
मनोरंजन

Ishaan Khatter Trolled: चुकून प्रमोशन झालं की मुद्दाम केलं! ईशान इंस्टाग्रामवर लाईव्ह आला अन् ट्रोल झाला..

Vaishali Patil

Ishaan Khatter Trolled: बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टरने धडक चित्रपटातुन बॉलिवूडमध्ये एंट्री केली आणि त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. तो त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतोच मात्र त्यांच्या पर्सनल लाईफमुळेही लाईमलाईटमध्ये राहतो.

ईशानच्या चाहत्यांची संख्याही बरिच आहे. सोशल मिडियावर त्याला चाहते फॉलो करत असतात. तो चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाही. मात्र सोशल मिडियावर ईशानने असं काही तरी केलं की त्याला आता नेटकरी ट्रोल करु लागले आहे.

ईशान खट्टरने चाहत्यांसोबत इंस्टाग्राम लाइव्ह सेशन दरम्यान एक मोठी चूक केली. त्याला दुबईतील एका कार्यक्रमाचे निमंत्रण आले होते. यासंबधी तो त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारत होता.

नंतर त्याच्या लक्षात आलं की तो इंस्टा लाईव्ह बंद करायचं विसरला आणि त्यांच्या गप्पा चाहत्यांनी ऐकल्या. हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं त्याने घाईघाईत ते बंद केलं. मात्र आता त्याचं हे संपूर्ण संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

ईशानच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणतोय की त्याला दुबईत टीव्हीएस नावाच्या एका ब्रँडच्या कार्यक्रमाचे आमंत्रण मिळालं आहे.

त्यावेळी त्याचा मित्र त्याला म्हणतो की, टीव्हीएस आता बाईक किंवा काहीतरी लॉन्च करणार असतील.

त्यावेळी ईशान त्याला नकार देतो आणि अचानक त्याचं लक्ष मोबाईलकडे जातं, त्याला लक्षात आले की त्याचं लाईव्ह सेशन अजूनही सुरुच आहे. तो ते बंद करण्याचं विसरला आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओमुळे तो ट्रोल होतोय. तो उगाच कसलं तरी प्रमोशन करण्यासाठी जूनी आयडिया वापरत असल्याचं नेटकरी म्हणत आहे.

एका नेटकऱ्याने म्हटलं की, "क्रॅप मार्केटिंग स्ट्रॅटेजी ही खुप जूनी पद्धत आहे. तर दुसऱ्याने लिहिलं की, "खरचं खुप वाईट अभिनय.. ही फक्त प्रमोशनल स्ट्रॅटेजी आहे. "

तर एकानं लिहिलयं की, कोण आपल्या मित्रासोबत इतका कंटाळवाण्या गप्पा मारतो. ही फक्त एक प्रमोशनल स्ट्रॅटेजी आहे." आता ईशानने हे चुकून केलं की त्याने खरचं प्रमोशन केलयं हे तर त्याला माहिती मात्र ईशान त्याच्या या कृत्यामुळे ट्रोल होतोय.

इशान लवकरच कृष्ण मेनन दिग्दर्शित 'पिप्पा' या चित्रपटात दिसणार आहे. यात त्याच्यासोबत मृणाल ठाकूर, प्रियांशू पैन्युली आणि सोनी राजदान यांचाही समावेश आहे. चित्रपटाची कथा ब्रिगेडियर बलराम सिंग मेहता यांनी लिहिलेल्या 'द बर्निंग चाफी' या पुस्तकावर आधारित आहे. तो यापुर्वी फोन भूत मध्ये दिसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT