Jaunpur Ganpati Utsav Dance Controversy Akshara Singh Program In Jaunpur Crowd Created Ruckus SAKAL
मनोरंजन

Akshara Singh: बिहारमध्ये गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात गायिकेने गायलं अश्लील गाणं! कार्यकर्त्यांनी केली तोडफोड

गायिका अक्षरा सिंगने गणेश उत्सवादरम्यान अश्लील गाणं गायल्याने जनतेने राडा केलाय

Devendra Jadhav

Akshara Singh News: सध्या सगळीकडे गणपती उत्सव जल्लोषात सुरु आहे. अनेक ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी लोकं गर्दी करताना दिसत आहेत. अशातच बिहारमध्ये मात्र गणेश उत्सवादरम्यान मोठा राडा झालेला दिसून येतोय.

बिहारमध्ये जौनपूरमध्ये बुधवारी गणपती उत्सवादरम्यान गोंधळ झाला. गायिका अक्षरा सिंगने गणेश उत्सवाच्या पवित्र सणाला अश्लील गाणं गायल्याने उपस्थित प्रेक्षकांनी एकच राडा केलाय. काय झालं नेमकं पाहूया.

(Jaunpur Ganpati Utsav Dance Controversy Akshara Singh Program In Jaunpur Crowd Created Ruckus)

अक्षरा सिंगच्या कार्यक्रमात राडा

बिहारमध्ये गणेश उत्सवादरम्यान अक्षरा सिंगने ‘जाने मारे लेहेंगा ए लखनौवा…’ हे प्रसिद्ध गाणे म्हणायला सुरुवात करताच उपस्थित प्रेक्षकांनी पंडालमधील खुर्च्या एकमेकांना फेकून मारल्या.

कार्यक्रमस्थळी तीन ठाण्यांचा पोलिस फौजफाटा आणि तीनशेहून अधिक बाऊन्सर असूनही परिस्थितीवर नियंत्रणात येऊ शकली नाही. अखेर अक्षरा सिंहला स्टेज शो सोडावा लागला. या कार्यक्रमाचे आयोजन केरकटचे आयएएस अधिकारी अभिषेक सिंग यांनी केले होते.

गणेश उत्सवात भोजपुरी गाण्यावर लोक रागावले

या कार्यक्रमात झालेल्या गदारोळाचे कारण एका धार्मिक कार्यक्रमात अश्लील गाण्यांचे आयोजन असल्याचे सांगितले जात आहे. गणेश उत्सवासारख्या पवित्र कार्यक्रमात भोजपुरी अश्लील गाणी आणि नृत्यामुळे लोक संतप्त झाल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.

जौनपूरमध्ये जेव्हा अक्षरा सिंग स्टेजवर येताच लोकांनी 'जाने मारे लेहेंगा ए लखनौवा...' गाण्याची मागणी केली. अक्षरा सिंगने गायला सुरुवात करताच लोकांनी राडा केला.

या गोंधळात डझनभर लोक जखमी झाले

अक्षरानेही पब्लिक डिमांडवर 'जाने मारे लेहेंगा ए लखनौवा...' गायला सुरुवात केली. मात्र काही वेळातच गोंधळ सुरू झाला. लोकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकायला सुरुवात केली. लाथा-बुक्क्या सुरू झाल्या.

बचाव कार्यादरम्यान सुरक्षा कर्मचारीही जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून अक्षरा सिंहने स्टेज शो मध्येच सोडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डझनभर लोक जखमी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT