Javed Akhtar  Esakal
मनोरंजन

Javed Akhtar: अगस्त्यची थेट ऋषी कपुरसोबत तुलना! 'द आर्चीज' पाहून अमिताभ बच्चन यांच्या नातवाचे फॅन झाले जावेद अख्तर

Vaishali Patil

गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच स्टार किड्सचा अभिनय असलेला 'द आर्चीज' या चित्रपटाची चर्चा आहे. हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या माध्यमातून सुहाना खान, खुशी कपूर, अगस्त्य नंदा यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. अनेकांना त्याचा अभिनय आवडला तर अनेकांनी या स्टार किड्सवर टीकाही केली आहे.

तर मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी या स्टार किड्सचे कौतुकही केले आहे. तर या सगळ्यात आता लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी देखील हा सिनेमा पाहिला आहे. द आर्चीजचे दिग्दर्शन जावेद अख्तर यांची मुलगी झोया हिने केले आहे.

आता हा चित्रपट पाहिल्यानंतर अख्तर हे अगस्त्य नंदाचे चाहते झाले आहेत. 'द आर्चीज' पाहिल्यानंतर त्यानी अगस्त्यच्या अभिनयाची खूप तोंड भरुन प्रशंसा केली इतकच नाही तर जावेद अख्तर यांनी अगस्त्याची तुलना थेट ऋषी कपूर यांच्याशी केली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत जावेद अख्तर यांनी सांगितले की, अगस्त्यचा परफॉर्मन्स पाहून त्यांनी श्वेता नंदाला सांगितले की, तिचा मुलगा स्टार होईल.

'रेडिफ'ला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर म्हणाले की, ते स्वत:च्या मुलीची स्तुती करू शकत नाही त्यांनी तसे केल्यास त्यांच्यावर टीका केली जाईल पण यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांचे नातू असलेल्या अगस्त्य नंदाचे कौतुक केले.

अगस्त्य नंदाचे कौतुक करताना जावेद अख्तर म्हणाले, 'आजकाल आपण माचो आणि टॉक्सिक हिरोंचा ट्रेंड पाहत आहोत, पण अगस्त्य हा एक निरागस हिरो आहे, जो शो ऑफच्या जगापासून दूर आहे. 'बॉबी'च्या ऋषी कपूरनंतर इतका निरागस हिरो प्रेक्षकांनी पाहिला नव्हता. 50 वर्षांपूर्वी ऋषींच्या पदार्पणानंतर अगस्त्य नंदा हा एक चांगला कलाकार आला आहे. आणि सर्व तरुण-तरुणींना तो खूप आवडेल.

द आर्चीज 7 डिसेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित झाला. यात सुहाना खान, नंदा आणि खुशी कपूरशिवाय वेदांग रैना, मिहिर आहुजा आणि युवराज मेंडा यांनेही डेब्यू केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT