Jay-Mahi Daughter Tara: Esakal
मनोरंजन

Jay-Mahi Daughter Tara: अवघ्या चौथ्या वर्षी माही अन् जयच्या लेकीची उंच भरारी!

जय भानुशाली आणि माही विज यांची मुलगी तारा न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवर दिसली आहे.

Vaishali Patil

Jay-Mahi Daughter Tara: बॉलिवूड अभिनेता जय भानुशाली आणि अभिनेत्री पत्नी माही विज यांची लेक तारा विज ही लहानपणीच कुण्या मोठ्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. अवघ्या चार वर्षाची तारा ही सोशल मिडियावर खुप सक्रिय असते.

तिचे फोटो आणि व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. चार वर्षांची मुलगी तारा देखील सोशल मीडियाचा एक प्रसिद्ध चेहरा आहे आणि तिचे खूप चाहते आहेत.

काल ताराचा वाढदिवस होता जो तिच्यासाठी आणि तिच्या पालकांसाठी खुपच स्पेशल ठरला. त्यांची लाडकी मुलगी तारा तिच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवर चमकली आहे.

3 ऑगस्ट 2023 ला तारा चार वर्षांची झाली. वाढदिवसाची खुप मोठी भेट ताराला मिळाली आहे. जय भानुशालीने त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवरील ताराचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये जय आणि माहीची लेक मस्ती करताना दिसत आहे आणि यात ती खूप क्यूट दिसत आहे. अवघ्या चौथ्या वर्षी तिची ही उपलब्धी नक्कीच मोठी आहे.

Jay-Mahi Daughter Tara:

जय आणि माही यांनी आपल्या लेकीच्या यशावर प्रतिक्रिया दिली आहे. माहीने लिहिले, "गर्वित आई." तर जयने लिहिलयं, "जेव्हा मी म्हणतो की मला माझ्या मुलीसारखं चाहत्यांचं प्रेम हवं आहे तेव्हा माझं म्हणणं हे असतं."

जय आणि माहीचे लग्न 2011 मध्ये झालं. लग्नाच्या सात वर्षांनंतर त्यांनी खुशी आणि राजवीर यांचे पालक बनण्याचा निर्णय घेतला. तर 3 ऑगस्ट 2019 रोजी माही आणि जय यांनी त्यांची मुलगी ताराचं स्वागत केलं. माही लेकीचे फोटो नेहमी सोशल मिडियावर शेयर करत असते. बऱ्याचदा ताराचे काही व्हिडिओ सोशल मिडियावर ट्रोलही होत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : पुणे -मुंबई जुना महामार्गावर वंचित कडून रास्ता रोको

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

Ambabai Temple Restoration : ब्रेकर आणि ग्राईंडरचा वापर! अंबाबाई मंदिराच्या संवर्धनात मोठी हेरफेर; पुरातत्त्व विभागाविरोधात हिंदुत्‍ववादी संघटनांसह सर्वपक्षीय आक्रमक

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT