Jaya Bachchan Bollywood Actress Angry on paparazzi  esakal
मनोरंजन

Jaya Bachchan : नातवाचा चित्रपट पाहायला गेल्या, तिथंही जयाजी भडकल्या! घडलं काय?

बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन या नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असणाऱ्या सेलिब्रेटी आहेत.

युगंधर ताजणे

Jaya Bachchan Bollywood Actress Angry on paparazzi : बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन या नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असणाऱ्या सेलिब्रेटी आहेत. त्या त्यांच्या रागीटपणाबद्दल आणि परखड बोलण्याबाबतही नेहमीच ओळखल्या जातात. आता लाडक्या नातवाच्या चित्रपटाच्या प्रीमिअरला गेलेल्या जयाजी यांच्या त्या व्हिडिओनं पुन्हा एका वेगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

अमिताभ बच्चन, जया बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हा झोया अख्तरच्या द आर्चीज नावाच्या चित्रपटातून डेब्यू करतो आहे. किंग खानची लेक सुहाना खान देखील या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल टाकणार आहे. या चित्रपटाच्या प्रीमिअरला अनेक सेलिब्रेटींनी उपस्थिती लावल्याचे दिसून आले आहे. याचवेळी जया बच्चन या त्यांच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आल्या आहेत.

दुसरीकडे ऐश्वर्याचा देखील एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये ती अगस्त्यची गंमत करते आहे. पापाराझ्झींना फोटोसाठी पोझ देत असताना ती अगस्त्यला म्हणते की, आता या सगळ्याची तुला सवय व्हायला हवी. त्याचवेळी अगस्त्य देखील फोटोसाठी पोझ देत नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

जयाजी पुन्हा संतापल्या....

द आर्चीज च्या प्रीमिअरला जया बच्चन या आपल्या कुटूंबासमवेत गेल्या होत्या. त्यावेळी पत्रकार, पापाराझ्झींनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. जयाजी या टीना अंबानी यांच्यासोबत फोटोसाठी पोझ देत होत्या. त्याचवेळी फोटोग्राफर्सनं जयाजी यांना काही सुचना केल्या. त्यावरुन त्यांचा संताप झाला. ओरडू नका.... असं त्यांनी पापाराझ्झींना निक्षुन सांगितलं. तो व्हिडिओ व्हायरल झाल आहे.

द आर्चीजच्या प्रीमिअरला बिग बी अमिताभ बच्चन, किंग खान शाहरुख खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या रॉय, आराध्या बच्चन, श्वेता बच्चन, नव्या नवेली नंदा आणि बच्चन-नंदा कुटुंबातील अनेक सदस्य यावेळी उपस्थित होते. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याची चर्चा होत आहे. अगस्त्यनं पूर्ण कुटूंबासमवेत एक फोटो शेयर केला आहे. त्यात अभिषेक आणि ऐश्वर्या, आराध्या वेगळ्या लूक मध्ये दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंडमध्ये मंत्र्याचं निधन, छातीतली कळ नॉर्मल समजून सहन करत राहिले, २ तासांनी तीव्रता वाढली अन्...

Marathi News Live Updates : विद्यानंद बापटांना मारहाण करणाऱ्याचा चांदीचं कडं देऊन सत्कार करणार : संग्राम भंडारे

Nashik Accident: गोदाघाटावर थरार! गांधी तलावात पाच मुले बुडू लागली; चार जीवरक्षकांनी वाचविले चौघांचे प्राण, एकाचा मृत्यू

Manoj Jarange: ‘मुंबईला जाण्यापासून रोखण्याचे स्वप्न पाहू नका’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, सलाइन-पाणीही बंद

Nepal Floods: माणुसकीचे दर्शन! कुटुंबाबरोबरच पूरग्रस्तांच्या शोधासाठी प्रयत्न; आप्त हरवले...तरीही इतरांसाठी धडपड

SCROLL FOR NEXT