jhimma 2 trailer out now siddharth chandekar sayali sanjeev shivani surve nirmiti sawant SAKAL
मनोरंजन

Jhimma 2 Trailer: आई होणं म्हणजे फक्त बाई होणं नसतं तर.. हसता हसता डोळ्यात पाणी आणणारा झिम्मा 2 चा ट्रेलर बघा

झिम्मा 2 चा ट्रेलर बघाच

Devendra Jadhav

Jhimma 2 Trailer News: गेल्या अनेक दिवसांपासुन मराठी मनोरंजन विश्वात एका सिनेमाची चर्चा आहे तो म्हणजे झिम्मा 2. झिम्मा 2 सिनेमाचा टीझर आणि मराठी पोरी या गाण्याने सोशल मीडियावर चांगलीच हवा केली.

नुकतंच झिम्मा 2 चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. हा ट्रेलर हसवता हसवता डोळ्यात पाणी आणतो.

झिम्मा 2 च्या ट्रेलरमध्ये काय?

झिम्मा 2 च्या ट्रेलरमध्ये सुरुवातीला पाहायला मिळतं की निर्मिती सावंत आणि सुचित्रा बांदेकर गाडीत बसले आहेत. निर्मिती गाडी चालवत असल्याने सुचित्रा घाबरल्या आहेत. कट टू त्यांना परदेशातला पोलीस अडवतो. निर्मिती त्यांच्या तोडक्यामोडक्या इंग्रजीत त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात.

पुढे सर्व झिम्मा गँग इंदूच्या वाढदिवसानिमित्त एकत्र आलेली दिसतो. रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे या दोघी झिम्मा गँगमध्ये सहभागी झाल्यात.

बाई होणं म्हणजे फक्त आई होणं नाही. शेवटचा श्वास आहे तोपर्यंत जगून घ्यायचं, अशा वाक्याने ट्रेलर आपल्याला हळवं करतो. एकुणच हसवता हसवता झिम्मा 2 चा ट्रेलर डोळ्यात पाणी आणतो.

झिम्मा 2 ची रिलीज डेट काय?

कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मीत,  हेमंत ढोमे दिग्दर्शित तसेच सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर  यांच्या दमदार भुमिका असलेला ‘झिम्मा २’ हा चित्रपट २४ नोव्हेंबरला सर्व सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT