Juhi Chawla Birthday Esakal
मनोरंजन

Juhi Chawla Birthday: जूहीची संपत्ती जाणून व्हालं थक्क!

सकाळ डिजिटल टीम

Juhi Chalwa’s Net Worth: नव्वदच्या दशकात आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावणारी अभिनेत्री जूही चावला आजही तितकीच लोकप्रिय आहे. आज जूही तिचा 56 वा वाढदिवस साजरा करत आहे.

तिने बॉलिवूडवर तीन दशकाहुन अधिक काळ राज्य केलंय. तिच्या 'कयामत से कयामत तक', 'इश्क' आणि 'येस बॉस' यासारख्या चित्रपटीतील भूमिका अजूनही नावाजल्या जातात.

आपल्या अभिनय आणि सौंदर्याचा ठसा उमटवणारी जुही चावला आज 56 वर्षांची झाली आहे. तिने तिच्या आयूष्यात अनेक चढ उतार पाहिलेत. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या संपत्तीवर एक नजर टाकूयात..

जुही चावला तिच्या अभिनयातून खूप कमावते. यासोबतच ती जाहिरातीतूनही चांगली कमाई करते. चित्रपट आणि जाहिरातींव्यतिरिक्त जुही चावला तिच्या व्यवसायातूनही चांगलीच कमाई करते. अहवालानुसार, जुही चावलाची एकूण संपत्ती जवळपास 44 कोटी रुपये आहे.

जुही तिच्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी 20 लाख रुपये घेते. जुही चावलाने 1995 मध्ये बिझनेसमन जय मेहताशी लग्न केले. जय मेहता 350 मिलियन डॉलर इतक्या संपत्तीचे मालक आहेत. त्याचबरोबर जुही चावला एकटी 70 कोटींच्या मालमत्तेची मालक आहे.

जुहीचे मुंबईतील मलबार हिल्स येथे एक आलिशान अपार्टमेंट आहे. त्याचबरोबर जुही चावलाने आलिशान प्रॉपर्टी खरेदी केली आहे. मापगाव येथे असलेल्या या मालमत्तेची किंमत सुमारे 1.89 कोटी रुपये आहे.

जुही चावलाला महागड्या कारची खूप आवड आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये 1.11 कोटी किमतीच्या Jaguar XLJ आणि 78 लाख किमतीच्या Audi Q7 (Audi Q7) सारख्या आलिशान कारचा समावेश आहे. जुही चावला इंडियन प्रीमियर लीगचा संघ कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ची भागीदार आहे. तिने शाहरुख खानसोबत ही टीम खरेदी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT