Sameer Khandekar: किती गोड! 'काहे दिया परदेस फेम' अभिनेत्याच्या मुलीचं बोरन्हाण, काय असतं ते? SAKAL
मनोरंजन

Sameer Khandekar: किती गोड! 'काहे दिया परदेस फेम' अभिनेत्याच्या मुलीचं बोरन्हाण, काय असतं ते?

समीरच्या मुलीचं मकरसंकांती निमित्त बोरन्हाण झालंय.

Devendra Jadhav

'काहे दिया परदेस' मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. याच मालिकेत अभिनेता समीर खांडेकरने वेणुगोपाल कामत हि भूमिका साकारली. समीरच्या मुलीचं मकरसंकांती निमित्त बोरन्हाण झालंय. मकरसंक्रांती निमित्ताने समीर आणि त्याची बायको वैभवी या दोघांनी त्यांच्या लेकीच बोरन्हाण केलंय. राही असं या दोघांच्या मुलीचं नाव आहे.

बोरन्हाण म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही त्याचं उत्तर देतो. १ ते ५ वर्षांच्या मुलांचे बोरन्हाण केले जाते. बोरन्हाण हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो. यासाठी हलव्याचे दागिने घालून लहान मुलांना खास तयार केले जाते. पाटावर बसवून त्यांचे औक्षण केलं जातं. बोरं, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या, बिस्कीट, गोळ्या, असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरुन ते टाकले जाते. एकप्रकारे बाळाला या पदार्थांनी अंघोळ घातली जाते.

समीर आणि वैभवी या दोघांनी मुलीचा बोरन्हाण सोहळा साजरा केला. या खास सोहळ्यासाठी समीर यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र आलेलं. समीर आणि वैभवीने राहीला खास ब्लॅक रंगाचा ड्रेस घालून तयार केले होते. तिच्या अंगावर हलव्याचे दागिने घातले होते. या दोघांनी मुलीचं खास फोटोशूट केलं.

समीर, वैभवी आणि राही या तिघांच्या फोटोशूटला त्यांच्या फॅन्सनी लाइक्स आणि कमेंट्स चा वर्षाव केलाय. समीरने काहे दिया परदेस मालिकेतून लोकप्रियता मिळावली. याशिवाय लकडाऊन, कॅरी ऑन मराठा, लव्ह लग्न लोचा, टाईमपास २ अशा सिनेमांमध्ये काम केलंय. समीरने काहीच दिवसांपूर्वी आसोवा नावाने स्वतःचं यु ट्यूब चॅनल सुरु केलंय. या चॅनलच्या माध्यमातून समीर विविध व्हिडिओजच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांच्या लाईफलाईनमध्ये पुन्हा राडा! प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत...; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

आजचे पंचांग 17 जुलै 2026! राहुकाल, शुभ मुहूर्त, चंद्रबळ आणि दिनविशेष

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींनी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

Jalgaon Railway Flyover Update : जळगावला आणखी दोन रेल्वे उड्डाणपुलांची चाहूल? 'या' प्रकल्प मार्गावर होऊ शकतो पूल; रेल्वे विभागाकडून महापालिकेत प्राथमिक चाचपणी

बाबो! स्वप्नील जोशीने घेतली ६५ लाखांची टेस्ला; भावनिक पोस्टनं जिंकली चाहत्यांची मनं

SCROLL FOR NEXT