Actress Kamya Panjabi  
मनोरंजन

'घटस्फोट झाला म्हणून महिलेनं जीव द्यावा का?'; ट्रोलरला काम्या पंजाबीचा सवाल

घटस्फोट आणि दुसऱ्या लग्नाबाबत टीका करणाऱ्या नेटकऱ्याची अभिनेत्री काम्या पंजाबीने घेतली शाळा

स्वाती वेमूल

घटस्फोट आणि दुसऱ्या लग्नाबाबत टीका करणाऱ्या नेटकऱ्याची अभिनेत्री काम्या पंजाबीने Kamya Panjabi चांगलीच शाळा घेतली. काम्याने ट्विटरवर तिच्या सणसणीत उत्तराचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये काम्याने शलभ दंगशी दुसरं लग्न केलं. महिला सशक्तीकरणाबद्दलचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत एका नेटकऱ्याने घटस्फोट आणि दुसऱ्या लग्नावरून टीका केली. 'स्वत:चं पहिलं लग्न तर टिकवू शकली नाही आणि आता दुसरं लग्न केलं, हद्दच आहे', अशी कमेंट संबंधित ट्रोलरने केली.

काम्याचं उत्तर-

'मग काय झालं? मला खुश राहण्याचा किंवा जगण्याचा हक्क नाही का? घटस्फोटा झाला तर महिलेनं जीव द्यावा का? घटस्फोटानंतर महिलेचं आयुष्य तिथेच संपतं का? तुमच्यासारखे विचार करणाऱ्यांच्याविरोधात आता प्रत्येक मुलीने आवाज उठवला पाहिजे आणि अनेकजणी आवाज उठवतसुद्धा आहेत. मला कमजोर समजू नका, लडकी हूँ लड सकती हूँ', अशा शब्दांत काम्याने ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलं.

काम्याने व्यावसायिक बंटी नेगीशी लग्न केलं होतं. दहा वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी २०१३ मध्ये घटस्फोट घेतला. काम्या आणि बंटी यांना आरा ही मुलगी आहे. घटस्फोटाच्या सात वर्षांनंतर काम्याने शलभशी लग्न केलं. या लग्नानंतर तिला अनेकदा टीकांचा सामना करावा लागला होता. याविषयी ती 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती, "घटस्फोट हा शब्दच खूप त्रासदायक आहे. देव करो तो कोणाच्याही आयुष्य न येवो. मात्र आपल्या समाजातील अनेक लोक घटस्फोटीत महिलेवर टीका करतात. एखाद्या महिलेला जर घटस्फोटानंतर पुन्हा नव्याने आयुष्याची सुरुवात करायची असेल तर तिच्याकडे चुकीच्या नजरेनं पाहिलं जातं. तिला साथ दिली जात नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT