Kangana Ranaut On Mystry Man And Dating Rumours esakal
मनोरंजन

Kangana Reaction : 'तुम्हाला फक्त सेक्शुअल...' 'मिस्ट्री मॅन' बाबत कंगनानं केला मोठा खुलासा, काय म्हणाली माहितीये?

बॉलीवूडची वादग्रस्त अभिनेत्री कंगना ही तिच्या एका फोटोमुळे चर्चेत आली होती.

युगंधर ताजणे

Kangana Ranaut On Mystry Man And Dating Rumors : बॉलीवूडची वादग्रस्त अभिनेत्री कंगना ही तिच्या एका फोटोमुळे चर्चेत आली होती. तो फोटो इतका व्हायरल झाला की त्यामुळे तिला त्यावरुन खुलासा करावा लागला. त्या फोटोमध्ये तिच्यासोबत असणारा मिस्ट्री मॅन कोण आहे, असा प्रश्न तिला विचारण्यात आला आहे.

काय म्हणाली कंगना?

मिस्ट्री मॅनसोबतचा तो फोटो व्हायरल झाल्यानंतर कंगनाला त्यावरुन खुलासा करावा लागला आहे. त्यात तिनं मोठी पोस्ट लिहून आपल्याविषयी लोकं कशाप्रकारे विचार करतात अन् त्यांना काय वाटते याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी देखील कंगनानं तिला ट्रोल करणाऱ्यांना परखडपणे सुनावले आहे. तिची ती पोस्ट चर्चेचा विषय आहे.

कंगना म्हणते, मला माहिती आहे माझा तो फोटो व्हायरल झाल्यानंतर चर्चेला सुरुवात झाली. मी बऱ्याचदा सलूनच्या बाहेर दिसते. त्यामुळे त्या व्हायरल झालेल्या प्रत्येक फोटोवर बोलणं मला योग्य वाटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, रस्त्यावरुन जाणाऱ्या प्रत्येक मुलगा अन् मुलगी यांच्यात सेक्शुअल रिलेशन असते असे समजणे चुकीचे आहे. त्यांच्यात दुसरेही नाते असू शकते की...मात्र लोकांना याचा विसर पडतो.

ती व्यक्ती कोणी एखादी चांगली हेअर स्टायलिस्ट असू शकते, किंवा कुणी एखादा क्लायंटही असू शकतो. किंवा तुमचा एखादा सह कलाकारही असू शकतो. मात्र आपल्याला लगेच त्यावरुन बोलण्याची घाई होते. तुम्ही एखाद्या सोबत बराच वर्ष काम केल्यानंतर तुमचा कुणी चांगला मित्रही होऊ शकतो. यावर कुणी विश्वासही ठेवत नाही.अशा शब्दांत कंगनानं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Kangana Ranaut On Mystry Man And Dating Rumours

तो फोटो व्हायरल झाला आणि चर्चेला आले उधाण...

त्याचं झालं असं की, कंगनाचा सोशल मीडियावर त्या मिस्ट्री मॅन सोबत फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर वेगवेगळ्या चर्चेला उधाण आल्याचे दिसून आले. यानंतर अनेकांनी कंगणाला ती व्यक्ती कोण आहे अशी विचारणाही केली होती. यानंतर कंगनाला अखेर त्यावरुन खुलासा करावा लागला आहे. तिनं तिच्या नेहमीच्या परखड अंदाजात दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय आहे.

कंगनाच्या आगामी प्रोजेक्टविषयी...

कंगनाच्या येत्या काळातील प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, तिचा बहुचर्चित इमर्जन्सी नावाचा चित्रपट लिस्टमध्ये आहे. त्यामध्ये तिनं भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा टीझर व्हायरल झाला होता. त्यात तिच्या अभिनयाचं चाहत्यांनी वारेमाप कौतुक केलं होतं.

कंगनाचा तेजस नावाचा चित्रपट नुकताच चाहत्यांच्या भेटीला येऊन गेला. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट फ्लॉप झाल्याचे दिसून आले. मात्र हा चित्रपट ओटीटीवर तुफान चालल्याचेही सांगण्यात येत आहे. याशिवाय तिच्या चंद्रमुखी नावाच्या चित्रपटाची देखील चर्चा झाली होती. त्यालाही प्रेक्षकांनी नाकारले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निदा खान HR नव्हती, POSH च्या तक्रारीही नाहीत; TCSकडून निवेदन, तर मुंब्र्यात राहणाऱ्या पतीने ठावठिकाणा सांगितला पण...

LPG Price: होर्मुझ खुला! LPG सिलेंडर आता स्वस्त होणार का? भारताच्या किमतींवर मोठा परिणाम?

एमआयएमची आणखी एक नगरसेविका अडचणीत, शपथपत्रात दिली खोटी माहिती

Washim News: भर उन्हात गॅससाठी नागरिकांचा जीव मुठीत; शेलूबाजारमध्ये संताप उसळला; पहाटेपासून रांगा, तरीही सिलिंडर मिळत नाही

Latest Marathi News Live Update : पुण्यात वारजे माळवाडी येथील पूलावर चारचाकी वाहनाला आग लागली

SCROLL FOR NEXT