Kangana Ranaut’s Diwali at home with family  Esakal
मनोरंजन

Kangana Ranaut: 'तेजस' फ्लॉप झाल्याचं दुःख विसरुन कंगनाने दणक्यात साजरी केली दिवाळी! व्हिडिओ व्हायरल

कंगनाने दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला. ज्याची झलकही कंगनाने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Vaishali Patil

Kangana Ranaut celebrates Diwali with family:

कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून तेजस या सिनेमामुळे चर्चेत होती. कंगनाला या चित्रपटाकडून खुप अपेक्षा होत्या मात्र तिचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.

त्यामुळे कंगनाची निराशा झाली. मात्र आता कंगनाने दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला. ज्याची झलकही कंगनाने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

कंगनाने पांढरा आणि गुलाबी रंगाचा कॉम्बिनेशन लेहेंगा परिधान केला होता. ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. त्या लेहेंग्यासोबत तिने प्लंगिंग नेकलाइन असलेला ब्लाउज आणि चोकर सेट, मॅचिंग कानातले, मांग टिक्का घातली होती. या लूकमध्ये ती पारंपारिक वेशात खुपच सुंदर दिसत होती. या व्हिडिओत कंगना आनंदाने नाचताना आणि गाणं गाताना दिसत आहे.

कंगनाने स्वतः इंस्टाग्रामवर असाच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. कॅप्शनमध्ये ती लिहिते, "दिवाळी नेहमीच गोंधळलेली, व्यस्त, रोमांचक असणं आवश्यक आहे. सणातून मला हे सर्व मिळत... खरं तर माझा आवडता सण... दिव्यांचा सण, आम्ही साजरी केलेल्या दिवाळीची काही झलक."

या व्हिडिओत कंगना तिची बहिणी, पुतण्या आणि कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवताना दिसत आहे. सध्या कंगनाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

कंगना राणौतच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले ती नुकतीच 'तेजस' चित्रपटात दिसली. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.

तिच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच 'इमर्जन्सी' या चित्रपटात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच ती 'सीता: द इनकार्नेशन' मध्ये देखील दिसली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Protest : सरकारकडून चर्चेची तयारी, तर दुसरीकडे मेट्रोची १५ स्टेशन्स बंद; राजधानीत काय घडतंय?

Sadabhau Khot Education : 'नीट विरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी आतंकवादी'; असे म्हणणाऱ्या सदाभाऊ खोतांचे शिक्षण झाले तर किती?

Live Updates Marathi : पाटणात कॉंग्रेस कार्यालयाबाहेर भाजपचे आंदोलन, कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप

४८ तास धोक्याचे! राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; घाटमाथ्यावर 'रेड अलर्ट', मुंबईसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी IN, रिंकू सिंगचे पुनरागमन, एकाचे पदार्पण! पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI

SCROLL FOR NEXT