Kangana Ranaut wants to work in action film esakal
मनोरंजन

Kangana Ranaut : 'तो जाम भारीये, त्याची अन् माझी जोडी कशी वाटेल', कंगनाच्या मनात आहे तरी कोण?

तिनं बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापासून ते रणवीर सिंह यांच्यापर्यत अनेक सेलिब्रेटींशी पंगा घेतला आहे.

युगंधर ताजणे

Kangana Ranaut wants to work in action film : बॉलीवूडची क्वीन कंगना सध्या वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपासून तिचं आणि निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांच्यात वाद सुरु आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानीवरुन तो वाद सुरु झाला. त्यात कंगना काही ऐकायला तयार नाही. अशावेळी पुन्हा तिची एक पोस्ट व्हायरल झाली आहे.

बॉलीवूडमध्ये आता कुणी असा सेलिब्रेटी राहिला असेल ज्याच्यावर कंगना बोलली नसेल, तिनं बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापासून ते रणवीर सिंह यांच्यापर्यत अनेक सेलिब्रेटींशी पंगा घेतला आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यासोबत घेतलेल्या वादामुळे तिला कोर्टापर्यत जावे लागले होते. अशातच कंगनावर नेटकऱ्यांकडून मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

आता कंगनानं एका बॉलीवूड अभिनेत्याचं कौतूक केलं आहे. त्याच्यासोबत आपल्याला काम करायला आवडेल असे सांगून चाहत्यांना धक्का दिला आहे. त्याचे कारण फार कमी वेळा असे होते की, कंगना कुणाचे कौतूक करते आहे. कंगनानं ज्या अभिनेत्याचे नाव घेतले आहे तो अभिनेता दुसरा कुणी नाही तर विद्यूत जामवाल आहे. कंगनानं त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केल्याचे दिसून आले आहे. आपला मुद्दा पटवून देण्यासाठी कंगनानं त्याच्या काही चित्रपटांचा संदर्भही दिला आहे.

कंगनानं तिच्या धाकड फिल्ममध्ये पहिल्यांदा अॅक्शन अभिनेत्री म्हणून काम केले होते. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता कंगनाला विद्युत जामवाल सोबत काम करायचे आहे. आगामी काळात त्याच्यासोबत एक फिल्म करायची असल्याचा इरादा कंगनानं बोलून दाखवला आहे.

कंगनाला असे वाटते की, तिला कुणी एखाद्या अॅक्शन फिल्ममध्ये कास्ट करावे. त्यात तिची आणि विद्युत जामवालची जोडी चांगली वाटेल. कंगनालाही विद्युत आवडतो. यासाठी तिनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीतील एक व्हिडिओ पुन्हा शेयर केला आहे. ज्यात ती विद्युत सोबत रँप वॉक करताना दिसत आहे. तो व्हिडिओ शेयर करताना कंगनानं लिहिलं आहे की, कशी आहे आमची जोडी, कुणी आम्हाला अॅक्शन फिल्ममध्ये घेईल का... त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT