kangna wants to help NCB 
मनोरंजन

कंगनाला करायची आहे नारकोटिक्स ब्युरोची मदत, म्हणाली 'मी सगळं सांगू शकते पण...'

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सुशांत प्रकरणात अभिनेत्री कंगना रनौट तिच्या पद्धतीने पहिल्यापासूनंच बॉलीवूजमधील काही खुलासे करत आहे. नुकतंच तिने आता ड्रग्स आणि बॉलीवूड कनेक्शन याबाबत नवे खुलासे केले आहेत. तिचे काही ट्विट्स समोर आले आहेत. या ट्विटमध्ये तिने बॉलीवूडमध्ये सगळ्यात प्रसिद्ध ड्रग कोणतं आहे याबाबत लिहिलं आहे. एवढंच नाही तर कंगनानं हे देखील म्हटलं आहे की ती नारकोटिक्स ब्युरो (NCB) यांची या तपासात मदत करण्यासाठी तयार आहे. मात्र त्याबदल्यात तिला केंद्र सरकारने सुरक्षा द्यावी.

सुशांत प्रकरणात जास्तच सक्रीय असलेल्या अभिनेत्री कंगना रनौटने काही ट्विट्स केले आहेत. यामध्ये तिने म्हटलंय, 'सिनेइंडस्ट्रीत सगळ्यात प्रसिद्ध ड्रग कोकिन आहे. याचा जवळपास प्रत्येक हाऊसपार्टीमध्ये वापर होतो. हे खूपंच महाग आहे मात्र सुरुवातीला जेव्हा तुम्ही कोणत्या उच्च दर्जाच्या हाऊसेजमध्ये जाता तेव्हा तेम मोफत दिलं जातं. MDMA चे क्रिस्टल पाण्यात टाकले जातात आणि तुमच्या नकळत ते तुम्हाला प्यायला दिले जातात.'

यासोबतंच कंगनाने आणखी एक ट्विट केलं आहे ज्यामध्ये तिने म्हटलंय, 'मी या प्रकरणात नारकोटिक्स ब्युरोची मदत करु इच्छिते. आणि हे त्यांच्यासाठी खूपंच फायदेशीर ठरु शकतं कारण मी हे सगळं स्वतः पाहिलं आहे. पण मला केंद्र सरकारकडून सुरक्षा हवी आहे. हे केवळं माझ्या करिअरसाठीच नाही तर माझ्या आयुष्यासाठीही धोकादायक ठरु शकतं. या गलिच्छ सिक्रेट्स बद्दल नक्कीच सुशांतला पुसटशी कल्पना असावी त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली असावी.'   

यावर सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने देखील ट्विट केलं आहे. श्वेताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पीएमओला टॅग करत म्हटलं आहे की 'कंगनाला सुरक्षा द्या जेणेकरुन ती नारकोटिक्स ब्युरोची मदत करु शकेल.' रिया चक्रवर्तीचे ड्रग चॅट व्हायरल झाल्यानंतरचे या केसला पुन्हा एकदा नवीन वळण मिळालं आहे.    

kangana ranaut offers help to narcotics bureau in return ask for security from pmo  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काव्या मारनचा मोठा डाव! सनराइजर्सच्या नव्या कर्णधाराची घोषणा; टेस्ट टीममधून डच्चू मिळालेल्या स्टार खेळाडूकडे दिली टीमची धुरा

Fake Fertilizer Scam : खत म्हणून विकत होते चक्क मीठ! सोलापुरात १० लाखांच्या भेसळयुक्त खतांचा साठा जप्त; कृषी विभागाचा मोठा छापा

Mahabaleshwar Nachani Village : स्ट्रॉबेरी विसरा! महाबळेश्वरमधील 'या' गावाने ओळखच बदलली; आता थेट बनलेय 'नाचणीचे गाव', शेतकऱ्यांना मिळणार बियाणे अन् खते मोफत

Solapur IT Park : सोलापूर आयटी पार्कच्या जागेबाबत मोठा ट्विस्ट! CM फडणवीसांच्या घोषणेनंतर प्लॅन बदलला? 'त्या' 50 एकर जागेचं काय होणार? सामंतांच्या विधानाने नवा पेच

Latest Marathi News Live Update : कुल्लू-मनालीकडे मोठ्या संख्येने पर्यटक जात असल्याने तिथे गाड्यांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT