Kangana Ranaut On Oppenheimer Esakal
मनोरंजन

Kangana Ranaut On Oppenheimer: 'भगवद्गीतेचा तो सीन खुप आवडला' ओपेनहायमर पाहिल्यानंतर कंगनाची प्रतिक्रिया चर्चेत

Vaishali Patil

Kangana Ranaut On Oppenheimer: गेल्या काही दिवसापासून हॉलीवूडच्या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यात पहिला बार्बी अन् दुसरा ओपनहायमर. त्यात ओपनहायमर बद्दल भारतीयांना जरा जास्तच उत्सूकता होती.

प्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलननं ओपनहायमरचं दिग्दर्शकन केल्यानं त्यान आधीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतले आहे. भारतात काहींना हा चित्रपट खुप आवडला तर काहींनी या चित्रपटला विरोध केला.

ओपनहायमर सिनेमात असलेल्या भगवद्गीतेचा एक सीन दाखवण्यात आला आहे. या सीनवर भारतात अनेकांनी आक्षेप घेतला तर काहींनी नाराजी व्यक्त केलीय.

आता बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतने हिने सिनेमाबद्दल तिचं मत मांडलं आहे. तिनं नुकताच हा सिनेमा पाहिला आणि सोशल मिडियावर व्हिडिओ शेयर करत चित्रपटाबाबतचा रिव्ह्यू शेयर केला.

फोटो ट्विटरवर शेअर करताना कंगना रणौतने लिहिले, 'ओपनहायमर डे... खुप अप्रतिम चित्रपट आहे. फिजिक्स, पॉलिटिक्स आणि इतिहास यांचं छान मिश्रण असलेला सिनेमा खुप आवडला. जर सिनेमॅटिक ऑर्गेझम असं काही असेल तर माझ्यासाठी तो Oppenheimer आहे.

कंगनाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओही शेअर केला. यातही तिने पुर्ण चित्रपटाची स्टोरी थोडक्यात सांगतिली आणि चित्रपट नक्की पहा असं आवाहन केलं . इतकच नाही तर चित्रपटातील भगवद्गीतेचा सीन तिला खुप आवडल्याचं सांगितलं आहे.

'ओपेनहायमर' 21 जुलै रोजी रिलीज झाला होता. अणुबॉम्बचा जनक जे रॉबर्ट ओपनहायमर यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांनी आणि समिक्षकांनी खुप पसंती दिली आहे. जगभरातून आतापर्यत ओपनहायमरनं कोट्यवधीचा व्यवसाय केला आहे. भारतातून देखील ओपनहायरमरनं मोठी कमाई केली आहे. Sacnik नुसार 11 दिवसात आतापर्यंत 95.15 कोटी जमा झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT