Chetan Kumar Ahimsa google
मनोरंजन

'हिजाब' प्रकरणात अटक की अपहरण? कन्नड अभिनेत्याच्या पत्नीचा आरोप

चेतन कुमारनं हिजाब प्रकरणावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांविरोधात ट्वीट केले होते.

प्रणाली मोरे

हिजाब(Hijab) वरुन सुरु असलेला वाद आता राज्या-राज्यात पेटून उठला आहे. थेट कोर्टात आता हे प्रकरण गेलं आहे. 'हिजाब' संदर्भात सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वचजणं व्यक्त होताना आपण पाहत आहोत. अनेक सेलिब्रिटींनी तर हिजाबचं समर्थन करीत बॉलीवूडला रामराम करण्याची घोषणा केली आहे. याच हिजाब प्रकरणावरुन आता आणखी एका कन्नड अभिनेत्याला अटक झाल्याची बातमी येत आहे. कन्नड अभिनेता चेतन कुमार अहिंसा याला हिजाब प्रकरणावर कोर्टात सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांविरोधात ट्वीट केल्यामुळे ही अटक झाली आहे.

सेंट्रल डिव्हिजनचे पोलिस उपायुक्त एमएन अनुचेथ यांनी यासंदर्भात स्पष्टिकरण देताना सांगितलं आहे की,''कन्नड अभिनेता चेतन कुमार याला मंगळवारी २२ फेब्रुवारी,२०२२ रोजी बंगळुरु शहरातील पोलिसांनी ही अटक केली आहे. त्याच्या विरोधात आईपीसी की ५०५(२) आणि ५०४ कलम अंतर्गत तक्रार करण्यात आली आहे''. चेतन कुमारने केलेल्या ट्वीटच्या आधारावर त्याच्याविरोधात शेषाद्रिपुरम येथे तक्रार नोंदवण्यात आली होती.

चेतनला अटक करण्याच्या एक दिवस आधी त्याची पत्नी मेघानं आरोप केला होता की,'' काही पोलिस अधिकारी आले आणि त्याला घेऊन गेले. पण तेव्हापासून तो गायब आहे''. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यामातून लाइव्ह येऊन तिनं सांगितलं की,''कोणतंही अटक वॉरंट न आणता पोलिस चेतनला सोबत घेऊन गेले. तेव्हापासून माझा त्याच्याशी काहीच संपर्क नाही. हे एक प्रकारचं अपहरण आहे. चेतनचा फोनही बंद लागत आहे,त्याच्या सुरक्षारक्षकाचा फोनही बंद येतोय. मी शेषाद्रिपुरम पोलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी गेले तेव्हा कळालं की तो त्या पोलिस ठाण्यात आलाच नाही. त्याला चौकशीसाठी कुठेतरी दुसरीकडे नेण्यात आलं आहे. त्याला गायब करण्यात आलंय. पण का?''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT