Kantara 2 Rishabh Shetty Director connection with prabhas  
मनोरंजन

Kantara 2 : 'कांतारा २' येणार, प्रिक्वेलबाबत मोठी बातमी आली समोर! 'सालार' सोबत आहे खास कनेक्शन

साऊथच्या कांतारा चित्रपटानं प्रेक्षकांची अमाप लोकप्रियता मिळवली होती.

युगंधर ताजणे

Kantara 2 Rishabh Shetty Director connection with prabhas : साऊथच्या कांतारा चित्रपटानं प्रेक्षकांची अमाप लोकप्रियता मिळवली होती. ऋषभ शेट्टीच्या या चित्रपटाला प्रेक्षक, समीक्षक यांची पसंती मिळाली. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटानं मोठी कमाई केल्याचे दिसून आले होते. एका आगळ्या वेगळ्या विषयाची तितकीच प्रभावी मांडणी करुन कांतारानं लक्ष वेधून घेतले होते.

अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीनं अनेक मुलाखतींमधून कांताराची निर्मिती प्रक्रिया आणि या चित्रपटाशी असलेले भावनिक नाते याकडे देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. या चित्रपटाचा बॉलीवूडनं रिमेक करु नये अशी त्यांना विनंतीही केली होती. यावरुन ऋषभ कांताराशी किती भावनिक पातळीवर जोडला गेला होता हे दिसून येईल. कांताराचा दुसरा भाग येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

कांताराचा प्रिक्वेल येणार असल्याचे बोलले जात आहे. एनडीटीव्हीनं याबाबत अधिक माहिती दिली आहे. होम्बाले फिल्म्सच्या वतीनं कांताराची निर्मिती करण्यात आली होती. याच प्रॉडक्शन हाऊसनं यापूर्वी केजीएफ आणि केजीएफ २ ची देखील निर्मिती केली होती. आता ऋषभनं कांतारा २ ची तयारी सुरु केल्याचे बोलले जात आहे.

कांतारा २ आणि प्रसिद्ध अभिनेता प्रभासच्या सालारचे काही खास कनेक्शन आहे अशीही जोरदार चर्चा आहे. प्रभासचा सालार याच वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. कांतारा २ हा कांताराचा प्रिक्वेल असून २७ नोव्हेंबर रोजी त्याचे मुहूर्त पूजन असल्याचे सांगण्यात येत आहे. पीरिअड ड्रामा प्रकारातील कांताराच्या कथेनं प्रेक्षक प्रभावित झाले होते. त्यातील ऋषभच्या अभिनयाचे कौतुक झाले होते.

कांतारा २ च्या मुहूर्ताला अभिनेता ऋषभ शेट्टी, निर्माता विजय किरागंदूर आणि इतर कलाकार उपस्थित राहणार आहेत. डिसेंबरमध्ये त्याच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार असून त्यानंतर कलाकारांची नावं घोषित केली जाणार आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कांतारा प्रदर्शित झाला होता. त्याचे संगीत, छायाचित्रण, अभिनय, कथा, पटकथा याला प्रेक्षकांची दाद मिळाली होती.

ऋषभ शेट्टीचा कांतारा २ हा देखील पॅन इंडिया प्रोजेक्ट असणार आहे. सध्या होम्बाले फिल्मचा सालार पार्ट १ सीझफायर नावाचा चित्रपट चर्चेत आहे. त्याचे दिग्दर्शन प्रशांत निल यांनी केले असून त्यात प्रभास हा मुख्य भूमिकेत आहे. २२ डिसेंबर २०२३ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट आणि कांतारा २ चे खास कनेक्शन असल्याचीही चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT