kantara chapter 1 prequel first look released on 27 november  SAKAL
मनोरंजन

Kantara Chapter 1: पुन्हा घडणार दिव्य दर्शन! 'कांतारा' प्रिक्वेलचा फर्स्टलूक या दिवशी येणार भेटीला

कांताराच्या प्रिक्वेलबाबत मोठी घोषणा करण्यात आलीय

Devendra Jadhav

Kantara Chapter 1: 'कांतारा' सिनेमा चांगलाच गाजला. कांतारा सिनेमाने अनपेक्षितपणे प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. 'कांतारा' ची संकल्पना, विषय, कथा, अभिनय अशा अनेक गोष्टींची प्रचंड चर्चा झाली.

आता 'कांतारा'च्या चाहत्यांसाठी खुशखबर. 'कांतारा' चा प्रिक्वेल म्हणजेच 'कांतारा चाप्टर 1' च्या फर्स्ट लूकची तारीख जाहीर झालीय. त्यामुळे 'कांतारा'च्या प्रिक्वेलची उत्सुकता शिगेला आहे.

(kantara chapter 1 prequel first look)

'कांतारा' चा प्रिक्वेलचा फर्स्ट लूक या दिवशी भेटीला येणार

ऋषभ शेट्टीचा 2022 च्या ब्लॉकबस्टर कांताराचा प्रीक्वेल, 27 नोव्हेंबरला मुहूर्त पूजेसह फ्लोरवर जाईल. चित्रपटासाठी भव्य सेट तयार करण्यात येत आहे. अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी, निर्माते विजय किरगंडूर आणि इतर कलाकार आणि क्रू सदस्य मुहूर्त पूजेला उपस्थित राहणार आहेत.

मुहूर्ताच्या पूजेनंतर निर्माते डिसेंबरमध्ये चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात होईल. याचदिवशी म्हणजेच २७ नोव्हेंबरला दुपारी १२.२५ वाजता चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ऋषभ शेट्टीने ही माहिती सर्वांसोबत शेअर केलीय.

कांतारा आणि प्रभासच्या सलारचे कनेक्शन

कांतारा २ आणि प्रसिद्ध अभिनेता प्रभासच्या सालारचे काही खास कनेक्शन आहे अशीही जोरदार चर्चा आहे. प्रभासचा सालार याच वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता प्रभासच्या सलार आणि कांताराचं खरंच काही कनेक्शन आहे का, हे काहीच दिवसात स्पष्ट होईल.

कांतारा सिनेमाच्या पीरिअड ड्रामा प्रकाराने प्रेक्षक प्रभावित झाले होते. त्यातील ऋषभच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. कांतारा प्रिक्वेलचा फर्स्ट लूक पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT