kapil sharma show actor Jayvijay Sachan Wedding with abhiruchi singh photos viral  SAKAL
मनोरंजन

Jayvijay Sachan Wedding: 'कपिल शर्मा शो'मधील अभिनेत्याने प्रसिद्ध गायिकेसोबत केलं लग्न, फोटो व्हायरल

कपिल शर्मा शोमधील प्रसिद्ध अभिनेत्याने लग्न केलंय

Devendra Jadhav

Jayvijay Sachan Wedding News: सध्या अनेक कलाकार विवाहबंधनात अडकत आहेत. काही दिवसांपुर्वी रणदीपने गर्लफ्रेंडसोबत लग्न केलं. याशिवाय स्वानंदी - आशिष, गौतमी - स्वानंद हे कलाकार सुद्धा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

अशातच आणखी एका प्रसिद्ध कलाकाराने लग्नगाठ बांधली आहे. हा कलाकार म्हणजे जयविजय सचान. कपिल शर्मा शोमधील प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन जयविजय सचानने लग्न केलंय. गायिका अभिरुची सिंगसोबत त्याने लग्नगाठ बांधली आहे.

जयविजयने केलं थाटामाटात लग्न

जयविजय आणि गायिका अभिरुची या दोघांनी थाटामाटात एकमेकांशी लग्न केलंय. त्यांच्या लग्नाला दोघांचे कुटुंबिय आणि मित्रमैत्रीण उपस्थित होते. यावेळी जयविजयने शेरवानी तर अभिरुचीने मॅचिंग साडी नेसली होती. दोघांच्या लग्नाचे सुंदर फोटो पाहताच लोकांनी त्यांच्यावर लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय.

लग्नानंतर जयविजयची प्रतिक्रिया

जयविजयने लग्नाचे सुंदर फोटो पोस्ट केले आहे. या कॅप्शन लिहिलंय त्यांनी लिहिले, "22.12.23 - या दिवशी माझं एक स्वप्न पूर्ण झालं! शेवटी माझ्या आयुष्यातील प्रेमाशी लग्न केले आणि मला जे प्रेम आणि कृतज्ञता वाटतेय ते मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. आमच्या कुटुंबियांनी आणि मित्रांनी हा दिवस खूप खास बनवल्याबद्दल धन्यवाद."

जयविजय शाहरुख खान, नवाझुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी अशा सुप्रसिद्ध कलाकारांची मिमिक्री करण्यासाठी लोकप्रिय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd ODI: विराट कोहलीचा चौकार अन् मोडला राहुल द्रविडच्या नावावरील मोठा विक्रम! इंग्लंडमध्येही ठरला 'किंग'

IND vs ENG 2nd ODI: अनपेक्षित... भारतीय संघात एक बदल; विजयी संघात बदल करण्याची वेळ का आली? शुभमन गिल म्हणाला...

भारतातून OnePlus ची एक्झिट? 2027 पर्यंत कंपनी बंद होणार असल्याची चर्चा; ज्यांच्याकडे आत्ता मोबाईल आहे त्यांनी काय करायचं? वाचा

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया आणि चेतनची न्यायालयीन कोठडी कायम

Varandha Ghat Landslide Risk: वरंधा घाटात दरडींचा धोका कायम; रस्त्याशेजारील मातीचे ढिगारे तातडीने हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT