Yodha New Release Date Esakal
मनोरंजन

Yodha New Release Date: शाहरुखच्या 'डंकी' अन् प्रभासच्या 'सालार'ला 'योद्धा' घाबरला! करणने घेतली माघार?

Vaishali Patil

Yodha New Release Date: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान हा जवान चित्रपटानंतर आता डंकी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तर दुसरीकडे शाहरुखच्या डंकीला प्रभासचा सालार टक्कर देण्यासाठी सज्ज आहे.

मात्र आता या लढाईत आणखी एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर एंट्री मारणार होता तो चित्रपट म्हणजे करण जोहर दिग्दर्शित 'योद्धा'.

मात्र करणने आता या युद्धात आपल्या योद्ध्याला न उतरवण्याचा निर्णय घेतला असल्याचं दिसतय. करण जोहरने योद्धा चित्रपटाची रिलिज डेट पुन्हा बदलली आहे.

सिद्धार्थ मल्होत्राचा 'योद्धा' हा चित्रपट 15 डिसेंबरला रिलीज होणार होता मात्र आता 'डंकी' आणि 'सलार' रिलीज झाल्यानंतर 'योद्धा'ला चित्रपटगृहात चांगला प्रतिसाद मिळेल की नाही याबाबत करण साशंक असल्याच्या चर्चा सुरु असतानाच आता करणने हा सिनेमा येत्या 8 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे.

'योद्धा' चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर ओझा आणि सागर आंब्रे यांनी केले आहे. ज्यात सिद्धार्थ मल्होत्रा, दिशा पटानी आणि राशि खन्ना सारखे हिट कलाकार आपला दमदार अभिनय करताना दिसतील. मात्र या चित्रपटाच्या रिलिजचा मुहूर्त करण जोहरला सापडतोय की नाही असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे.

'योद्धा' हा चित्रपट यापुर्वी 7 जुलै रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र आता योद्धाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. या चित्रपटाची तारीख डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली 15 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार होता.

मात्र आता पुन्हा या चित्रपटाची रिलिज डेट बदलण्यात आली आहे. आता दिग्दर्शक जोडी सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा यांच्या फ्रँचायझीचा पहिला अॅक्शन चित्रपट, आता 8 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal NH48 Bridge : कागलकरांचं स्वप्न होणार पूर्ण! 295 कोटींचा 50 पिलरचा भव्य उड्डाणपूल; देशातील सर्वात सुंदर पूल साकारणार, मंत्री मुश्रीफ यांची पायाभरणीवेळी ग्वाही

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

SCROLL FOR NEXT