kareena saif shooting 
मनोरंजन

करिना आणि सैफ घरातंच शूटींग करण्यात बिझी, करिनाने व्हिडिओमध्ये दाखवल्या पडद्यामागच्या गोष्टी

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- करिना कपूर आणि सैफ अली खान लॉकडाऊनमध्ये घरातंच एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. अनलॉकनंतर दोघांनीही घरातंच अनेक नवीन प्रोजेक्ट शूट केले आहेत. याचदरम्यान करिना कपूर खानने तिच्या सोशल साईटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये दोघंही घरातंच शूटींग करताना दिसत आहेत.

करिनाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये सैफ अली खान सोफ्यावर बसलेला दिसतोय. त्याच्या हातात काही स्नॅक्स असलेला एक बाऊल आहे. समोर सैफला शूट करताना कॅमेरामन दिसतोय.आणि बाजुलाच करिना बसली आहे जी हा व्हिडिओ शूट करताना पाऊट करत आहे.  करिनाने तिचा हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना करिनाने लिहिलं, 'जेव्हा कधी गोंधळ वाटत असेल तेव्हा पाऊट बनवा. पतीसोबत पुन्हा एकदा घरातंच शूटींग.'

करिना लवकरंच आई होणार आहे त्यामुळे सध्या करिना, सैफ आणि त्यांचा मुलगा सोशल मिडियावर चांगलेच चर्चेत आहेत. करिनाच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांचं लक्ष असून त्यावर प्रतिसाद देताना दिसून येतायेत. काही दिवसांपूर्वीच करिनाने एका प्रसिद्ध मासिकासाठी फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटच्या ड्रेसिंगमध्ये करिनाने सैफचे शर्ट्स वापरले होते. विशेष म्हणजे करिनाचे हे सगळे फोटो पती सैफ अली खाननेच काढले होते. यामध्ये करिनाचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला होता. 

सिनेमांच्याबाबतीत सांगायचं झालं तर करिना 'लाल सिंह चढ्ढा' या सिनेमात दिसून येणार आहे. यामध्ये ती आमीर खानसोबत झळकणार आहे. आमीरने काही दिवसांपूर्वीच तुर्कीमध्ये जाऊन या सिनेमाच्या शूटींगला पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. हा सिनेमा २०२१ मधील नाताळच्या दरम्यान रिलीज होणार आहे.   

kareena kapoor shares behind the scenes video shoot with saif ali khan at home 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Semi Final : हे, बरोबर नाय...! Smriti Mandhana अम्पायरवर नाराज झाली, ऑस्ट्रेलियाची चतुराई की भारताचं दुर्भाग्य?

Jio offers: जिओ ग्राहकांना खुशखबर! 35 हजार रुपयांची मोफत सेवा मिळणार; सुरुवातीला 'याच' ग्राहकांना फायदा

Vande Bharat Sleeper Train: आनंदाची बातमी! देशातील पहिली वंदे भारत स्लिपर ट्रेन रुळांवर लवकरच धावणार, अखेर रेल्वेकडून मान्यता

Justice Suryakant India’s New Chief Justice : न्यायमूर्ती सूर्यकांत असणार भारताचे नवे सरन्यायाधीश! राष्ट्रपतींनी केली नियुक्ती

Latest Marathi News Live Update : आरोग्य विभागाच्या शासकीय निधीत अपहार

SCROLL FOR NEXT