Kiran mane esakal
मनोरंजन

Kiran mane: "घड्याळवाला अमरीशपुरी, धनुष्यबाणवाला प्रेमचोपडा आणि..."; किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Kiran mane: नुकतीच अभिनेते किरण माने (Kiran mane) यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

priyanka kulkarni

Kiran mane: लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तारखा काल निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. यंदा महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे या तारखांना मतदान होणार आहे तर 4 जून रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या तारखांबाबत नुकतीच अभिनेते किरण माने (Kiran mane) यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

किरण माने यांची पोस्ट

किरण माने यांनी नुकतीच त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल लिहिलं आहे. या पोस्टमध्ये किरण मानेंनी लिहिलं, "महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक... पण गुजरातमध्ये एकाच टप्प्यात? का?? घे की एकाच टप्प्यात हिकडंबी मर्दा. घड्याळवाला अमरीशपुरी, धनुष्यबाणवाला प्रेमचोपडा आणि तुमचा स्वत:चा कवठ्या महांकाळ असतानाबी हिंमत होईना व्हय? हे बरोबर नाय राव.हा न्याय नाही, अन्याय आहे!" किरण मानेंच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

किरण माने यांनी चित्रपट आणि मालिकांमध्ये केलं काम

रावरंभा,स्वराज्य (2011) आणि अपहरण (2005), टकाटक-2 (2022) या चित्रपटांमध्ये किरण माने यांनी काम केलं. काही दिवसांपू्र्वी त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्या राजकारणातील एन्ट्रीची सोशल मीडियावर बरीच चर्चा देखील झाली. मराठी बिग बॉसमुळे किरण मानेंना विशेष लोकप्रियता मिळाली.

'मुलगी झाली हो' या मालिकेत देखील किरण माने यांनी काम केलं. या मालिकेतून त्यांना काढण्यात आल्यानं मोठी कॉन्ट्रॉव्हर्सी निर्माण झाली होती. दिव्या पुगावकर,योगेश सोहोनी,शर्वणी पिल्लई या कलाकारांनी देखील 'मुलगी झाली हो' या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती.

सोशल मीडियावरील पोस्टमुळे असतात चर्चेत

किरण माने हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी किरण माने यांनी 'मुलगी झाली हो' या मालिकेचा उल्लेख करत एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये किरण माने यांनी प्राजक्ता केळकर आणि श्वेता आंबीकर यांच्यासोबतचा फोटो शेअर केला होता.

या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं होतं, "'मुलगी झाली हो' च्या वेळी माझ्यावर खोट्या आरोपांच्या फैरी झडत असताना... अचानक स्वत:च्या करीयरची पर्वा न करता माझ्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहीलेल्या या माझ्या जिगरी मैत्रीणी !"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: अजितदादांच्या अपघात झालेल्या विमानातून मीही...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठं वक्तव्य, काय म्हणाले?

Mumbai: मुंबईत प्रवेश करताना दिसणार भव्य स्वागतद्वार! सर्व एंट्री पॉइंट्सवर प्रवेशद्वार बांधणार; रितू तावडेंची मोठी घोषणा

IND vs SA, Viral Video: गौतम गंभीरने लाईव्ह सामन्यात हार्दिक पांड्याचे कान उपटले... अरे तुला चेंडू तिथे टाकायची काय गरज!

धक्कादायक! Donald Trump यांच्या घरात बंदूक-इंधन कॅनसह घुसखोरीचा प्रयत्न; गुप्तहेरांच्या गोळीबारात संशयित ठार

Indrayani River Pollution: इंद्रायणी प्रदूषणास जबाबदार कंपन्यांवर कारवाई करणार; महापौर रवी लांडगे यांचा इशारा!

SCROLL FOR NEXT