know about new actress alaya furniturewala who debut with saif ali khan
know about new actress alaya furniturewala who debut with saif ali khan  
मनोरंजन

पहिलाच चित्रपट केला सैफसोबत, कोण आहे ही बॉलिवूडची हॉट न्यूकमर ?

वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूडमध्ये एकामागोमाग नवनवीन कलाकारांची एन्ट्री होत आहे. अधिकतर स्टार किड्स हे बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहेत. पहिल्या चित्रपटावरुन लोक तुम्हाला पाहतात आणि अभिनयाची चाचणी करतात. पहिला चित्रपट कोणासोबत केला आहे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. अशाच एका क्युट आणि हॉट अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. जाणून घ्या कोण आहे ही नवीन अभिनेत्री ? 

नवीन वर्षात एकापेक्षा एक चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळत आहे. बॉलिवूडचा नवाब म्हणजेच सैफ अली खान नेहमीच अनोखी भूमिका साकारताना दिसतो. मागिल वर्षी 2019 मध्ये सैफ 'लाल कप्तान' या चित्रपटातून झळकला. तर, वर्षाच्य़ा सुरुवातीलाच तो 'तान्हाजी' या चित्रपटातून दिसला आहे. तान्हाजीला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच सैफच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'जवानी जानेमन' असं त्या चित्रपटाचं नाव असून ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटामध्ये सैफसोबत नवीव स्टार किड डेब्यू करत आहे. अलाया फर्ऩिचरवाला असं तिचं नाव आहे. अलायाचा हा पहिला चित्रपट असून सैफसोबत ती दिसणार आहे. पहिल्याच चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तिच्या उत्तम अभिनयाची झलक दिसून आली. अलाया पूजा बेदीची मुलगी आहे. 

अलायाचं खरं नाव 'आलिया' असं आहे पण, बॉलिवूडमध्ये आधीच एक आलिया भट्ट असल्याने तिने नाव बदलण्याचा निर्णय घेतला. अलायाची आई म्हणजेच पूजा बेदीचा घटस्फोट झाला आहे. अलाया पाच वर्षांची असतानाच त्यांचा घटस्फोट झाल्याचे तिने सांगितले आहे. पूजाचे आई-वडिलही अभिनय क्षेत्रातच होते. कबीर बेदी आणि प्रोतिमा बेदी यांची ती मुलगी आहे. त्यामुळे अलायाला अभिनयाचा वारसा लाभला आहे. 
पूजा बेदी सध्या बॉलिवूडमधील चित्रपटांपासून दूर आहे. पण, ती एक कॉलमिस्ट आहे. शिवाय ती अनेक शो होस्ट करते. 200 मध्ये ती बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती. 

पहिल्याच चित्रपटासाठी ती एक्साईट आहे. 'जवानी जानेमन' या चित्रपटामध्ये ती सैफ आणि तब्बू यांच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. 

सुपरफिट, बोल्ड, हॉट आणि क्युट अशी ही अलाया चित्रपटातून काय कमाल करते हे पाहण्यासाठी 31 जानेवारीपर्य़ंत वाट पहावी लागेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT